आता वीकेंड घरातच; हाॅटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:02+5:302021-06-28T04:24:02+5:30

भंडारा : कोरोनामुळे पुन्हा एकदा हाॅटेल व्यवसायावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पूर्वीप्रमाणे फक्त पार्सल सेवा सुरू राहणार असल्याने नागरिकांची ...

Now the weekend is at home; Hotelling will remain closed | आता वीकेंड घरातच; हाॅटेलिंग राहणार बंद

आता वीकेंड घरातच; हाॅटेलिंग राहणार बंद

भंडारा : कोरोनामुळे पुन्हा एकदा हाॅटेल व्यवसायावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पूर्वीप्रमाणे फक्त पार्सल सेवा सुरू राहणार असल्याने नागरिकांची हाॅटेलिंगही बंद होणार आहे. बदललेल्या नव्या ‘डेल्टा प्लस’ या रूपाने राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. डेल्टाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्य शासनाने नव्याने निर्बंध घातले आहेत.

यात आता पुन्हा एकदा हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवता येणार आहेत. विशेष म्हणजे, हॉटेलिंगची वेळच रात्री सुरू होत असल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. हाॅटेल दोन दिवस बंदच राहणार असल्याने हाॅटेल चालकही चांगलेच अडचणीत येतील.

सोमवार ते शुक्रवार ५० % क्षमता राहणार

मोठ्या हॉटेलवाल्यांची अडचण आहे. हॉटेलिंगची वेळच रात्री ८ वाजेनंतर सुरू होते. त्यात हॉटेल्स सायंकाळी ४ वाजता बंद करायचे आहेत. अशात मात्र हॉटेलवाल्यांनी व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

नव्या निर्बंधांनुसार हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. यात लहान हॉटेल्सचे ठीक आहे.

शहरात दिवसा हॉटेलात जेवण करायचा ट्रेंड नाही. रात्रीच हॉटेलिंगची वेळ असते. मात्र, आता निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे.

हाॅटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

पहिला लॉकडाऊन झाल्यापासूनच आमचे कठीण दिवस सुरू झाले. आता दुसऱ्या लॉकडाऊननंतर काम सुरू होत होते. त्यात पुन्हा नव्याने निर्बंध लागले आहेत. अशात आमच्या कामाचीही शाश्वती नसून कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-हाॅटेल कर्मचारी

हाॅटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?

दुसऱ्या लॉकडाऊनने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. आता काही दिवस होत नाही तोच पुन्हा निर्बंध लावले जात आहेत. अशात आमचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन, भाजीपाला-किराणा व अन्य दैनंदिन खर्च सुरूच आहेत.

-सुरेश पंचभाई, हाॅटेल चालक

हॉटेल व्यावसायिकांनी कर्ज घेऊन काम सुरू कले आहे. त्याची किश्त कशी भरायची, कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कसा, दैनंदिन खर्च कसे करायचे, असा प्रश्न आहे. नव्याने निर्बंध आल्याने खचलो आहोत.

-मनोज दलाल, हाॅटेल चालक

Web Title: Now the weekend is at home; Hotelling will remain closed