शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मदतीला असणार सखी डेस्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:10 IST

Bhandara : १७ पोलिस ठाण्यात यंत्रणा असते महिलांच्या दिमतीला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात १७ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास जाणाऱ्या महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, याकरिता महिला मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वी राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन पोलिस खात्याकडून होत आहे. सर्वच ठाण्यांत पोलिसांचा सखी डेस्क महिलांच्या मदतीला धावत आहे. आता कुठल्याही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होते. ऑनलाइन तक्रार संबंधितांकडे पाठविली जाते. 

पोलिस ठाण्यात महिला पथक आणि महिला कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी समुपदेशन केले जाते. त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचा प्रयत्न होतो. मागील काही वर्षामध्ये महिलांच्या विविध प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ, अत्याचार, विनयभंग किंवा विविध प्रकारच्या किरकोळ घटना, मारहाण, वाद, भांडण, तंटे अशा प्रकारच्या तक्रारी घेवून महिला तक्रारीसाठी पोलिस ठाणे गाठत असतात. पोलिस अधीक्षक कार्यालयअंतर्गत कार्यरत असलेल्या डायल ११२ यंत्रणेवरसुद्धा या महिलांना संबंधित तक्रार देता येते. महिलाना त्यांच्या रहिवास क्षेत्रातील घराजवळ असलेल्या ठाण्यात रीतसर अर्ज, तक्रार नोंद करता येते.

महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक ठाण्यात सखी डेस्ककेंद्र शासन व राज्य शासन गृह विभाग यांच्यावतीने महिलांच्या विविध प्रकारच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्यासाठी व त्यांची दखल घेण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी सर्व पोलिस अधीक्षक कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक ठाण्यात सखी डेस्क स्थापन करण्यात आले आहे. पती-पत्नीतील वादविवाद सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न होतो.

महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून

  • महिला मदत कक्ष: स्वतंत्रपणे महिलांसाठी मदत कक्षसुद्धा स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक ठाण्यात कर्मचारी नियुक्त केले आहेत. महिलांचे प्रश्न हे महिलांना सांगता यावेत, त्याचे अर्ज आणि शंकांचे निरसन होण्याकरिता महिला कर्मचारी, अधिकारी संवाद साधतात.
  • दामिनी पथक : शहरांतील बाजारपेठेत, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणे, जेथे महिलांची वर्दळ असते, अशा परिसरात महिलांना त्रासाला सामोरे जावे लागू नये, याकरिता दामिनी पथक कार्यरत आहे. या पथकाकडून गस्त घालून टवाळखोरांविरुद्ध किंवा छेडछाड प्रकरणात कारवाई करून महिलांना मदत मिळवून दिली जाते
टॅग्स :bhandara-acभंडाराPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे