आता, सट्टा व्यवसाय 'आॅनलाईन'

By Admin | Updated: November 8, 2014 22:32 IST2014-11-08T22:32:59+5:302014-11-08T22:32:59+5:30

दिवसाढवळ्या चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेला सट्टा व्यवसाय काही अंशी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बंद झाला असला तरी सट्टा किंगने शक्कल लढवून आॅनलाईन

Now, speculative business 'online' | आता, सट्टा व्यवसाय 'आॅनलाईन'

आता, सट्टा व्यवसाय 'आॅनलाईन'

पानटपरीवर छुप्या मार्गाने सुरू : पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
लाखांदूर : दिवसाढवळ्या चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेला सट्टा व्यवसाय काही अंशी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बंद झाला असला तरी सट्टा किंगने शक्कल लढवून आॅनलाईन सट्टा व्यवसायाकडे आपले लक्ष केले आहे. पानटपरीवर छुप्या मार्गाने हा व्यवसाय सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
लोकमत वृत्तपत्रात सट्ट्यातील गुंतवणुकीने गाठला कळस या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सट्टा चालविणारे एजंट व सट्टा किंगचे चांगलेच धाबे दणाणले. दुसऱ्या दिवशी पानटपऱ्यावर सुरू असलेला सट्टा व्यवसाय बंद दिसत असला तरी छुप्या मार्गाने हा व्यवसाय पोलिसांच्या डोळ्यादेखत काही प्रमाणात सुरूच होता. यासाठी एजंटांनी भ्रमणध्वनीवरून सट्टा व्यवसाय सुरूच ठेवल्याचा प्रकार चर्चेत होता. लोकमत वृत्तपत्राणे अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात सुरू केलेली नागरिक व वाचक वर्गात चांगलीच चर्चेत असून सट्टा व्यवसाय कायमचा बंद झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
तालुक्यात दोन सट्टा खावल असून विरली बु व लाखांदूर येथून सट्ट्याचे सुत्र चालतात. एकीकडे २३ तर दुसऱ्याकडे त्याहीपेक्षा जास्त एजंटांची नेमणूक करून वेळेचा आत हा व्यवसाय तेजोत सुरू असताना सध्या छुप््या मार्गाने सुरू आहे.
बारव्हा व बोथली भागात सध्या हा व्यवसाय सुरू असताना दिघोरी पोलीस स्टेशनच हद्दीत हे दोन्ही गाव येत असताना अद्याप कार्यवाही शुन्य दिसत आहे. लाखांदूर येथे पंचायत समिती परिसर शिवाजी चौक, बाजार समिती परिसरात तसेच शिवाजी विद्यालय परिसरात पानटपरी बंद करून आडोशाला हा व्यवसाय दुसऱ्याही दिवशी दिसून आला. भ्रमणध्वनीवर सट्टा व्यवसाय आता सुरू झाल्याने कार्यवाही कशी व कुणावर करायची प्रतिबंध कसा घालायचा हा पोलिसांपुढे पेच निर्माण झाला आहे.
लाखांदूर तालुक्यात सट्टा व्यवसाय जोमात सुरू असला तरी लोकमतने वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी लोकमतचे आभार मानले. ही प्रक्रिया अशीच सुरू ठेवा, अशी सूचनादेखील केली (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Now, speculative business 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.