आता पवनीत रेल्वे थांबणार
By Admin | Updated: August 7, 2014 23:47 IST2014-08-07T23:47:18+5:302014-08-07T23:47:18+5:30
नागपूर - नागभिड नॅरोगेज रेल्वेचा गेल्या १५ वर्षापासून बंद असलेला पवनी रोड प्रवासी थांबा दि. ८ आॅगस्ट पासून पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. प्रवासी यांना बंद झाल्यामुळे

आता पवनीत रेल्वे थांबणार
समस्या निकाली : नागरिकांमध्ये आनंदाचे वाताावरण
पवनी : नागपूर - नागभिड नॅरोगेज रेल्वेचा गेल्या १५ वर्षापासून बंद असलेला पवनी रोड प्रवासी थांबा दि. ८ आॅगस्ट पासून पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. प्रवासी यांना बंद झाल्यामुळे परिसरातील जनतेला बस किंवा अन्य वाहनाने नागपूरला जावे लागत होते. चौरस्ता सुरु झाल्याने लोकांनी मोर्चा आंदोलन व इतरत्र होता. रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन भिवापूर व भुयारच्या मध्ये अनेकादा पवनी रोडवर प्रवाशी थांबा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रवासी थांबा सुरु करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी १३० मिटर प्लेटफॉर्म, प्रवाशांना बसण्यासाठी १०० स्क्वेअर मिटर तिकीट घर हातपंप व रात्रीचे वेळी प्रकाशाकरिता विद्युत सोय केली आहे. प्रवासी थांबा सुरु करावा या मागणीसाठी जनतेने टोकाची भूमिका घेऊन वर्षापूर्वी रेल्वे रोको आंदोलन केले.
अनेक दिग्गज आजी माजी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झालेले होते. आश्वासनाची पूर्ती होत नाही म्हणून भंडारा जिल्हा रेल यात्री समितीच्या वतीने सचिव रमेश सुपारे यांनी रेल्वे मंत्रालय तत्कालीन खासदार यांचेकडे पत्रव्यवहार केला होता.
रेल्वे थांबा संघर्ष समितीचे दामोधर वाढवे यांचे प्रवासी थांब्यासाठी सतत प्रयत्न सुरु होते. या सर्वाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने पवनी रोड प्रवासी थांबा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे थांबणार
पवनी रोड अपमार्गावर रेल्वे क्र. ५८८४३ नागपूर नागभीड पॅसेंजर सकाळी ९.१६ वा., ५८८४७ नागपूर नागभिड पॅसेंजर रात्री २१.११ वा. थांबेल तर डाऊन म ार्गावर रेल्वे क्र. ५८८४४ नागभिड नागपूर सकाळी ७.१३ वाजता ५८८४६ नागभीड इतवारी १३.४३ वा. तथा ५८८४८ नागभिड नागपूर पॅसेंजर सायं. १७.४३ वा. पवनी रोडवर थांबणार आहे. (तालुका प्रतिनिधी)