आता मुक्त विद्यापीठाचे एम.ए. ठरणार समकक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 01:35 IST2016-07-18T01:35:26+5:302016-07-18T01:35:26+5:30

माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना त्याच्या अध्यापन विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्याशिवाय २४ वर्षानंतरच्या

Now M.A. of the Open University It's going to be equivalent | आता मुक्त विद्यापीठाचे एम.ए. ठरणार समकक्ष

आता मुक्त विद्यापीठाचे एम.ए. ठरणार समकक्ष

आदेश निर्गमित : शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश
भंडारा : माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना त्याच्या अध्यापन विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्याशिवाय २४ वर्षानंतरच्या निवडश्रेणीचा लाभ मिळत नसे मात्र आता शासनाने १५ जुलै रोजी शासन परिपत्रक काढले आहे. यात मुक्त विद्यापीठातून एम.ए. केले असले तरी लाभ देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक निवडश्रेणी पासुन वंचित शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी बऱ्याच शिक्षकांना तो अध्यापन अथवा पदवी केलेल्या विषयातच पदव्युत्तरपदवी घ्यावी लागत असे.
बीएससी पदवी धारण करणाऱ्या सेवेत असलेल्या शिक्षकांना नियमित एमएससी करणे अडचणीचे ठरत होते. यामुळे जेष्ठ एमएससी शिक्षक या लाभापासून वंचित होते. शिक्षक परिषदेचे रामनाथ मोथे यांनी हा प्रश्न लावून धरला होता. मागील हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. उल्हास फडके, अंगेश बेहलपाडे, अशोक वैद्य, पी. एम. नाकाडे, अशोक रंगारी, पी.पी. डोमळे यांच्या शिष्टमंडळापुढे तात्काळ परिपत्रक काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. १५ जुलैरोजी हे परिपत्रक शासनाने निर्गमित केले आहे. परिणामी आता अनेक शिक्षकांचा निवड श्रेणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे यादव गायकवाड, हरिभाऊ पडोळे, दिलीप वाणी, कांचन गहाणे, प्रदिप गोमासे, राजेश निंबार्ते, राजू बारई, पाडूरंग टेंभरे, राजेंद्र कढव, मनिषा काशिवार, स्नेहल खानापुरकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now M.A. of the Open University It's going to be equivalent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.