आॅनलाईन गैरव्यवहाराची आता होणार चौकशी
By Admin | Updated: February 25, 2015 01:13 IST2015-02-25T01:13:48+5:302015-02-25T01:13:48+5:30
मजुरांना काम मिळावे व त्यांच्या रोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी महात्मा गांधी रोजगार गॅरटी योजना अमंलात आणली. मात्र या योजनेला साकोलीत आॅनलाईन भ्रस्टाचार ...

आॅनलाईन गैरव्यवहाराची आता होणार चौकशी
साकोली : मजुरांना काम मिळावे व त्यांच्या रोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी महात्मा गांधी रोजगार गॅरटी योजना अमंलात आणली. मात्र या योजनेला साकोलीत आॅनलाईन भ्रस्टाचार करून गालबोट लावण्यात आले. त्यामुळे असाच भ्रष्टाचार जिल्ह्यातील या तालुक्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी चौकशीचे आदेश दीले आहेत.
पंचायत समीती साकोली येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात बनावटी कागदपत्राच्या आधारे लाखो रुपयांचा आॅनलाईन गैरव्यवहार करण्यात आला. यात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अल्का लोथे यांना अटक करण्यात आली असुन यातील तत्कालीन कर्मचारी उसगावकर हा अजुनही बेपत्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अपूर्ण आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समीतीचे अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे व मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी नुकतीच भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लांखादुर, तुमसर, मोहाडी, पवनी व भंडारा येथील खंडविकास अधिकारी यांची भंडारा येथे बैठक बोलावली. यात रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला व संबधीत अधिकाऱ्यांना पंचायत समीती अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामाची व आर्थीक व्यवहाराची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दीले.
तपास कासवगतीने
खंडविकास अधिकारी बोरकर यांनी या आॅनलाईन गैरव्यवहाराची तक्रार साकोली पोलीस स्टेशनला दिली. एक आठवड्यानंतरही पोलीसांचा तपास संथगतीने सुरु आहे. त्यामुळे पोलीसांच्या या तपासावर प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
न्यायालयीन कोठडी
साकोली पंचायत समीतीच्या रोजगार हमी योजनेच्या आॅनलाईन गैरव्यवहारप्रकरणी पोलीसांनी सहाय्यक कार्यक्रमअ धिकारी अल्का लोथे यांना अटक केली होती. पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज न्यायालयाने लोथे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)