आता हरित महाराष्ट्र अभियान

By Admin | Updated: July 5, 2015 00:38 IST2015-07-05T00:38:23+5:302015-07-05T00:38:23+5:30

पावसाळ्याची चाहूल लागली की वृक्षारोपनास प्रारंभ होतो. त्याला अधिक गती देण्यासाठी दरवर्षी सामाजिक वनीकरण

Now the Haryana Maharashtra campaign | आता हरित महाराष्ट्र अभियान

आता हरित महाराष्ट्र अभियान

वृक्षारोपणास प्रोत्साहन : विविध जातीचे रोपे होणार उपलब्ध
भंडारा : पावसाळ्याची चाहूल लागली की वृक्षारोपनास प्रारंभ होतो. त्याला अधिक गती देण्यासाठी दरवर्षी सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. साधारणपणे आॅगस्ट महिन्यात होणारा वन महोत्सव यंदा १ते १५ जुलै दरम्यान होणार असून त्याचे नामकरण 'हरित महाराष्ट्र अभियान' असे करण्यात आले आहे. या अभियानातून संपूर्ण पंधरवड्यात वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच विविध प्रजातीचे रोप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून वृक्षलागवडीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये वृक्ष लागवडी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता व समाजात पर्यावरण विषय जनजागृतीसाठी सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत १ते १५ जुलै दरम्यान हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे.
याकरिता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, वनश्री पुरस्कार विजेते, महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय आदीचा सहभाग घेण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)

फिरते रोप विक्री
हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत १ते १५ जुलै दरम्यान विविध प्रजाती सवलतीचे झाडे स्वस्त दरात विक्री, वितरण करण्याकरिता शहर, गावाच्या अनेक भागात वाहणाद्वारे फिरते विक्री करण्याचे सूचवण्यात आले आहे. तसेच रोप विकत घेणाऱ्यांना पुढील वर्षी कुठल्या वृक्ष प्रजाती किती संख्येत लागतील, याची मागणीही नोंदवण्यात येणार आहे. नागरिकांचा अभिप्रायही नोंदविला जाणार आहे.
स्थानिक समस्यांचा सहभाग
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत महापालिका, नगरपरिषद व त्यांच्या उपक्रमांतर्गत रस्ते, गावठाण, गावातील मोकळ्या जागा, गावातील शाळेचा परिसर, बाजापेठ, प्राथर्नास्थळे, स्मशानभूमी आदी परिसरात वृक्ष लागवड घेण्यासाठी उत्साहीत करण्यात येईल. तसेच वृक्षारोपणास इच्छुक शाळा, संस्थांना रोप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सवलतीच्या दरात रोपे
अभियानाअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध प्रजाती सवलतीच्या दरात विक्री करण्यासाठी शहरात, गावात वेगवेगळ्या दिवशी चार ते पाच ठिकाणी स्टॉल लावण्यात येणार आहेत. स्टॉल शक्यतो बाजारपेठेत किंवा बाजाराच्या दिवशी उभारण्यात येतील. या स्टॉलवर सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कमर्चारी इको क्लबचे विद्यार्थी यांच्या मदतीने माहिती देण्यात येणार आहे.
विविध माध्यमातून प्रसिद्धी
वृक्षारोपण, वृक्ष प्रजाती, गट लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, विविध योजना, परसबाग, वनौषधी आदींची माहिती देणारी फलके, घडीपत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Web Title: Now the Haryana Maharashtra campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.