आता अनुदान लाटण्याच्या प्रकाराला बसणार आळा
By Admin | Updated: February 15, 2015 00:37 IST2015-02-15T00:37:10+5:302015-02-15T00:37:10+5:30
अनुदान लाटण्याच्या प्रकाराची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून भंडारा जिल्ह्यातील अनुदानित बालगृह वसतीगृहात वास्तव्याला असणाऱ्या विद्यार्थ्यांची ...

आता अनुदान लाटण्याच्या प्रकाराला बसणार आळा
तुमसर : अनुदान लाटण्याच्या प्रकाराची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून भंडारा जिल्ह्यातील अनुदानित बालगृह वसतीगृहात वास्तव्याला असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती शाळा-महाविद्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी मागीतली आहे. यामुळे वसतीगृह संचालकांचे धाबे दणाणले आहेत.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा महिला बालविकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत एकूण १० बालगृह येतात. या बालगृह (वसतीगृहात) इयत्ता १२ वी पर्यंत विद्यार्थी विद्यार्थीनी राहतात. या बालगृहात मूलभूत सोयी सुविधा, आहेत काय याची माहिती संबंधित विभागाचे अधिकारी निश्चितच घेतात. परंतु येथे प्रवेश क्षमता व हल्ली प्रत्यक्षात वसतीगृहात निकती विद्यार्थी आहेत याची माहिती संबंधित विभाग वसतीगृहातील विद्यार्थ्यांची माहिती घेत आहे. यात वसतीगृहाचे नाव सवलतीचा बस पास आहे काय, भ्रमणध्वनी संपर्क पत्ता, कोणत्या गावाला राहतात. सायकलने ये-जा करीत आहेत काय, याची चौकशी करून माहिती मागितली आहे. प्रत्यक्षात बालगृहात विद्यार्थी वास्तव्याला कमी राहतात अशी माहिती आहे.
शाळेत छापील अर्ज पाठवून ही संपूर्ण माहिती मागितली आहे. प्रत्यक्षात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत भेट देवून माहिती गोळा केली असली तर जास्त पारदर्शिकता आली असती. परंतु येथे केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)