आता गडचिरोली शहर होणार डुक्करमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:20 IST2017-10-13T00:20:22+5:302017-10-13T00:20:35+5:30
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यासंदर्भात नागरिकांकडून पालिकेला तक्रारी प्राप्त झाल्या.

आता गडचिरोली शहर होणार डुक्करमुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यासंदर्भात नागरिकांकडून पालिकेला तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीची दखल नगर पालिका प्रशासनाने घेतली असून आता शुक्रवारपासून मोकाट डुक्कर पकडण्याची धडक मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी वाशिम येथून १० जणांचे पथक गडचिरोली शहरात दाखल झाले असून लवकरच गडचिरोली शहर १०० टक्के डुक्करमुक्त होणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर यांनी लोकमतशी बोलताना गुरूवारी दिली.
गडचिरोली शहराच्या बहुतांश वॉर्डात मोकाट डुकरांचा उपद््याप प्रचंड वाढला आहे. मोकाट डुकरे मुख्य मार्गानेही फिरत असल्याने अनेकदा वाहनांचे अपघात घडले आहेत. रात्रीअपरात्री डुकरे नागरिकांच्या घराशेजारी, गल्लीबोळात फिरून घाण पसरवित असतात. या तक्रारीची दखल घेऊन नगर पालिका प्रशासनाने सुरुवातील डुक्कर मालकांना नोटीस देऊन डुकरांचा बंदोबस्त करण्याचा इशारा दिला होता. ५ सप्टेंबर व ६ आॅक्टोबर रोजी डुकरांच्या मालकांना नोटीस बजाविण्यात आली होती. तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून डुक्कर पकडण्यासाठी पथकाची गरज असल्याचे पालिकेने आवाहन केले होते. आता वाशिम येथील पथक डुकरांच्या बंदोबस्तासाठी गडचिरोलीत दाखल झाले असून शुक्रवारीपासून मोहीम सुरू होणार आहे.