आता विदर्भ राज्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:08 IST2018-09-14T23:08:06+5:302018-09-14T23:08:30+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण विदर्भभर ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व १२० तालुक्याच्या ठिकाणी सामुहिक उपोषण (आत्मक्लेश) आंदोलन २ आॅक्टोंबरला गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे.

Now the fasting for the state of Vidarbha | आता विदर्भ राज्यासाठी उपोषण

आता विदर्भ राज्यासाठी उपोषण

ठळक मुद्देमहात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी आंदोलन : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण विदर्भभर ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व १२० तालुक्याच्या ठिकाणी सामुहिक उपोषण (आत्मक्लेश) आंदोलन २ आॅक्टोंबरला गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या ५ वर्षात स्वतंत्र विदर्भासाठी अनेक आंदोलने केली, त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या घरावर ठिय्या आंदोलन, नितीन गडकरींच्या घरावर ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, रेल रोको आंदोलन, विधान भवनावर मोर्चा, विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन, खासदारानो राजीनामे द्या, आंदोलन, धरणे, मेळावे आदी बरीच आंदोलने केली परंतू भाजपा सरकार म्हणजे गेंड्याच्या कातड्याचे सरकार आहे. त्याला जागच येत नाही. स्वातंत्र्यानंतर जनतेच्या मागणीला, जनतेच्या आंदोलनाला प्रतिसाद न देणारे हे भाजपाचे एकमेव सरकार आहे. यांना फक्त सत्ता पाहिजे जनतेची मागणी व जनतेचे प्रश्न सोडविणे हे त्यांना नको आहे.
१९९७ ला भाजपान भुवनेश्वर भाजपा कार्यकारिणीचा विदर्भाचा ठराव केला तेव्हा अटलजींना झारखंड, छत्तीसगड, उत्तरांचल तीन नविन राज्ये दिली परंतू विदर्भ दिला नाही. तेव्हा ही विदर्भावर अन्याय केला. २०१४ च्या निवडणूकीत तर विदर्भातील दोन्ही मोठे नेते यांनी आश्वासनच दिले होते की केंद्रात आमचे सरकार आले की आम्ही विदर्भ देणारच, विदर्भाच्या नावावरच त्यांन विदर्भामध्ये निवडणूका लढविल्या, आंदोलने केली परंतू ४ वर्ष सत्ता येवुन झाले २०१९ च्या निवडणूकीमध्ये पुन्हा सत्तेमध्ये येण्याची जारदार तयारी सुरु केली परंतु मागील निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्ती केली नाही व आता तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष म्हणतात भाजपाच्या अजेंड्यावर विदर्भ नाही.
म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीही निवडणुकीत आंदोलन समजून विदर्भातील जनतेस आवाहन करते कि, विदर्भाच्या जनतेच्या मतपत्रिकेवर भाजपा नाहीच, तुमच्या अजेंड्यावर विदर्भ नाही तर विदर्भाच्या जनतेच्या मतपत्रिकेवर भाजपना नाही, हे ही निवडणूक आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समिती जोरात राबणार आहे.
२ आॅक्टोंबर संपूर्ण विदर्भातील ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व संपूर्ण विदर्भातील तालुक्याचा ठिकाणी १ दिवसीय सामुहिक उपोषण स्वतंत्र विदर्भासाठी करण्यात येणार . त्यात जनतेने सामील व्हावे व त्यानंतर विदर्भासाठी आंदोलन अजून तिव्र करण्यात येणार आहे.
आज ११ सप्टेंबरला रोजी विदर्भ आंदोलन समितीची पवनी तालुक्याची सभा पवनी मच्छी उत्पादक सह. संस्ोिच्या सभागृहामध्ये घेण्यात आली. सभेमध्ये तालुका कार्यकारीणी तयार करण्यात येऊन जिल्हा समितीवर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झालेले हिरालाल खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.
सदर जिल्हा अध्यक्ष देवीदास लांजेवार यांचे अध्यक्षतेखाली मुख्य संयोजक राम येवले, रंजना गांगर्डे, मुकेश मासुरकर, प्रकाश पचारे, हिरालाल खोब्रागडे, मंगलमुर्ती सोनकुसरे, उमरेडकर, भगवान झंझाड, मोरेश्वर बोरकर, यशवंत बिरे, प्रल्हाद हुकरे, भाऊराव बन्सोड, दिपक उमरेडकर, गोपीनाथ वैद्य, फिरोज मोहरकर, वासुदेव गिºहेपुंजे, यादोराव मेंगरे, प्रमोद चावरे, मार्कंड हुकरे, नागोराव शिंदे, ओमप्रकाश हटवार, अरविंद लांजेवार, जयदेव कोसरे, राधेशाम ठोंबरे यांच्या उपस्थित पार पडली. प्रास्ताविक समितीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पचारे व संचालन हिरालाल खोब्रागडे यांनी केले.

Web Title: Now the fasting for the state of Vidarbha