आता आषाढातही शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:04+5:302021-07-19T04:23:04+5:30
भंडारा : जग कितीही बदलले असले तरीही आजही तारखा पाहूनच लग्नकार्ये केली जातात. आषाढात लग्नकार्य केली जात नसल्याची परंपरा ...

आता आषाढातही शुभमंगल सावधान
भंडारा : जग कितीही बदलले असले तरीही आजही तारखा पाहूनच लग्नकार्ये केली जातात. आषाढात लग्नकार्य केली जात नसल्याची परंपरा आहे; परंतु सध्या कोरोनामुळे जग बदलले आहे. सध्या अनेक ठिकाणी कोरोनामुळे थांबलेली लग्नकार्ये उरकली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरी भागात दिसून येत आहे. कोरोनापूर्वी आषाढ महिन्यात लग्नकार्य सहसा केले जात नसत. आता या परंपरेला फाटा दिला जात आहे. यासाठी अनेक शास्त्रीय कारणे असली तरी आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा या महिन्यात लग्नकार्य पार पाडले जात नाहीत. भंडारा शहरात अनेक मंगलकार्यालये आहेत यामध्ये तारखा बुकिंग केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनामुळे मंगलकार्यालयापेक्षा अनेक जण दारासमोरच लग्न करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थांबलेली अनेकांचे लग्न होत आहेत. अनेकांनी लग्न, तसेच अन्य कार्यक्रमही कोरोनामुळे थांबविले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने लग्न उरकले जात आहेत.
बॉक्स
मंगलकार्यालय बुक होत आहेत....
दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये लग्नकार्याचे प्रमाण फारच कमी असते. मात्र, कोरोनाने अनेकांचे विवाहसोहळे थांबले असल्याने सध्या मंगलकार्यालयेही काही प्रमाणात बुक होत आहेत. भंडारा शहरासह ग्रामीण भागातील मंगलकार्यालयांमध्ये १६, २२, २९ जुलै या तारखा बुक असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
५० नागरिकांच्या उपस्थितीलाच परवानगी....
जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही लग्नासाठी ५० जणांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली जात आहे. यामुळे ५० जणांची उपस्थिती गृहीत धरूनच लग्नकार्यासाठी बोलावले जाते. मात्र, प्रत्यक्षात याचे पालन करताना मंगलकार्यालय चालकांसह वधू-वर मंडळींना कठीण होत आहे.
बॉक्स
आषाढातही शोधल्या या शुभ तारखा
आषाढ महिन्याला सुरुवात झाली असून, या महिन्यात सहसा लग्नकार्य करण्यात येत नाहीत, असे वडीलधारी मंडळी सांगतात. मात्र, तरीसुद्धा काही जण अनेक पंडितांना विचारून या महिन्यातील १६, २२, २९ या तारखांना बुकिंग करीत आहेत.
कोट
आषाढ महिन्यात फार पूर्वीपासूनच लग्नसोहळे न करण्याची अनेक शास्त्रीय कारणे आहेत. यावर अनेक जण विश्वास ठेवत नसले तरीही आषाढ महिन्यात पावसामुळे रोगराईचे प्रमाण जास्त असते. सर्वत्र शेतीची कामे सुरू असतात. पावसाने विविध संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे लग्न आषाढ महिन्यात न करण्याची पूर्वापर परंपरा आहे. मात्र, आता या युगात कोणी कुणाला सांगावे आणि कुणी ऐकावे, असा प्रश्न आहे.
तानाजी गायधने, महाराज