आता जिल्ह्यात होणार ‘ई-डिस्ट्रिक्ट’ प्रणाली

By Admin | Updated: May 6, 2015 00:48 IST2015-05-06T00:48:17+5:302015-05-06T00:48:17+5:30

तहसील कार्यालयातून काढण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांदरम्यान नागरिकांना सुविधा मिळावी, यासाठी शासनाने सेतू केंद्रांची निर्मिती..

Now the district will have e-district system | आता जिल्ह्यात होणार ‘ई-डिस्ट्रिक्ट’ प्रणाली

आता जिल्ह्यात होणार ‘ई-डिस्ट्रिक्ट’ प्रणाली

१८१ महा-ई-सेवा केंद्रांची निवड : सेतू केंद्राचे महा-ई-सेवेत परिवर्तन
संजय मते भंडारा
तहसील कार्यालयातून काढण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांदरम्यान नागरिकांना सुविधा मिळावी, यासाठी शासनाने सेतू केंद्रांची निर्मिती केली. मात्र, आता त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जात जिल्ह्यातील १८१ महा ई सेवा केंद्रातून कामकाज होणार आहे. यासाठी जिल्हा ई-डिस्ट्रिक्ट प्रणालीने जोडण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
महाराष्ट्र शासनाने सेतू केंद्रातून नागरिकांना आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण करता यावे, यासाठी जिल्ह्यात सेतू केंद्र सुरू केलेत. यातून नागरिकांना जातीचा दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, शेतीसंबंधी सातबारा, शेतकऱ्यांच्या विविध नोंदी, शैक्षणिक दाखले ज्यात नॉन क्रिमिलेयर असे अनेक दाखल देण्यात येतात.
जिल्ह्यात १८१ महा-ई-सेवा केंद्र असून त्यांना या ई-डिस्ट्रिक्ट सेवेसंबंधी मोहाडी येथे महा-ई-सेवा केंद्र संचालकांचे प्रशिक्षण पार पडले. यात तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनांनाही प्रशिक्षण देण्यात आले. यापूर्वी केवळ सेतू केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातून नागरिकांना तहसील कार्यालयात जावून लागणारे दाखल काढावे लागते असे. यासाठी त्यांना शारीरिक, मानसीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असे.
शासनाने यात सुधारणा करून नागरिकांना त्यांच्याच गावात ही सुविधा मिळावी, यादृष्टिने एक पाऊल पुढे जात जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून ई-डिस्ट्रिक्ट्र सेवा सुरू करण्यात येत आहे. यात नागरिकांना होणार त्रास व अर्जनविसांकडून होणारी लूट थांबणार आहे. सोबतच आवश्यक असलेले प्रमाणपत्र आॅनलाईन मिळणार असल्याने तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही.
जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील सेतू केंद्र महा-आॅनलाईनने जोडणार असल्याने नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात १ मे पासून या सेवेचा शुभारंभ झाला आहे. भंडारा जिल्ह्यातही या सेवेचा लाभ नागरिकांना लवकरच मिळणार आहे. यादृष्टिने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
या योजनेमुळे नागरिकांचा त्यांच्या गावातूनच प्रमाणपत्र मिळणार असल्याने त्यांचा वेळ, पैसा वाचणार असून कामात पारदर्शकता येणार आहे.

ई-डिस्ट्रिक्ट प्रणालीने ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्र त्यांच्याच गावात मिळणार आहे. या प्रणालीमुळे कामात पारदर्शकता येणार असून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाही.
- आशिष वानखेडे
जिल्हा संयोजक, महा-ई-सेवा केंद्र, भंडारा.

नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी शासनाने घेतलेला योग्य निर्णय आहे. याची सुरूवात मोहाडी तालुक्यातून करण्याच्या दृष्टिने प्रायोगिक तत्वावर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. योजनेचा शुभारंभ लवकरच होईल.
-हरिश्चंद्र मडावी तहसीलदार मोहाडी

Web Title: Now the district will have e-district system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.