आता गावागावांत बाल संरक्षण समिती

By Admin | Updated: January 24, 2015 22:50 IST2015-01-24T22:50:02+5:302015-01-24T22:50:02+5:30

बालकांना अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण, बालसंरक्षणाविषयी जागृती, बालकांवरील अन्याय व अत्याचाराला आळा घालणे याच बरोबर बाल हक्क कायद्याची

Now the Child Protection Committee in the village | आता गावागावांत बाल संरक्षण समिती

आता गावागावांत बाल संरक्षण समिती

भंडारा : बालकांना अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण, बालसंरक्षणाविषयी जागृती, बालकांवरील अन्याय व अत्याचाराला आळा घालणे याच बरोबर बाल हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने गावागावांत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बैठकीत जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक गावात ११ सदस्यीय, तालुकास्तरावर १७ आणि नगरपालिका स्तरावर प्रभागनिहाय १२ सदस्यीय समिती २६ जानेवारीला स्थापन होणार आहे.
राज्य शासनाने १० जून रोजी अध्यादेश पारीत केला होता. त्यानुसार बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये सरपंच किंवा ग्रामपंचायतीने नियुक्त केलेला प्रतिनिधी अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका सदस्य सचिव राहील. याशिवाय पोलीस पाटील, आशा सेविका, अनुदानित प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलगा आणि मुलगी याबरोबरच स्वयंसेवी संस्था, बचतगट, महिलामंडळ आदी स्वयंसेवी संस्थांचे तीन सदस्य मिळून एकूण ११ सदस्य या समितीत राहतील.
तालुकास्तरीय समितीत तहसीलदार अध्यक्ष, वरिष्ठ बाल विकास प्रकल्प अधिकारीे सदस्य सचिव आणि बिडीओ, पोलीस अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आरोग्य विभाग, शिक्षण विभागाचा प्रत्येक एक आणि ग्राम बाल संरक्षण समितीचे पाच प्रतिनिधी, १२ ते १८ वर्ष वयोगटातील दोन मुले व दोन मुली तसेच स्वंसेवी संस्थांचे प्रतिनिधी राहतील. भंडारा, पवनी, तुमसर येथील प्रभागनिहाय समितीत नगरसेवक किंवा नगरसेविका, अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका सदस्य सचिव असेल. शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे नियुक्त एक मुख्याध्यापक किंवा शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पोलीस ठाण्यातील नियुक्त बाल संरक्षण अधिकारी, सामाजिक संस्थांचे दोन प्रतिनिधी एक वैद्यकीय अधिकारी, १२ ते १८ वयोगटातील दोन मुली आणि एक मुलगा अशी समितीची रचना असेल.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Now the Child Protection Committee in the village