आता जनावरांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:35 IST2017-09-12T23:35:04+5:302017-09-12T23:35:04+5:30

आता माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधारक्रमांक देण्याच्या कार्याला मुरमाडी (तुप) व खुटसावरी येथील पशु चिकित्सालयातर्फे प्रारंभ झाला आहे.

Now the base of the animals | आता जनावरांना मिळतोय आधार

आता जनावरांना मिळतोय आधार

ठळक मुद्देआता माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधारक्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : आता माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधारक्रमांक देण्याच्या कार्याला मुरमाडी (तुप) व खुटसावरी येथील पशु चिकित्सालयातर्फे प्रारंभ झाला आहे.
जनावरांना ओळख मिळवून देण्यासाठी शासनाची ही योजना देशभरात राबविली जात आहे. जनावरांची जात, वर्ग, देशी, विदेशी, शिंगे सरळ की वाकडी, शेपूट गोंडा, त्यांचा रंग आदी माहिती या आधार क्रमांकामुळे मिळणार आहे. जनावरांची इत्यंभूत माहिती भविष्यात आधारकार्ड क्रमांकामुळे मिळणार असून दुधाळ जनावरांची माहिती प्रथम संकलीत केली जाणार आहे. जनावरांची माहिती मिळविणे हा हेतू असला तरी गोमातेची कत्तलही या युनिक नंबरमुळे थांबविता येणार आहे. जनावरांचा बारा अंकी विशिष्ट ओळख क्रमांक असलेले आधार कार्ड हे फायबरचे असून ते जनावरांच्या डाव्या कानाला बसविल्या जात आहे. कान कापला किंवा जनावराचा मृत्यू झाला तरच हा टॅग निघेल. जनावरांना स्वत:ची ओळख मिळाल्याने चोरीचे प्रमाण आटोक्यात येतील. विक्री व्यवसायासाठी भविष्यात दाखल्याची गरज राहणार नाही. आधार कार्डानुसार गाय, म्हशीला टॅग दिल्यावर लसीकरण, रेतन, व्यायली कधी, काय जन्मली याबाबतची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या संदर्भात लाखनी परिसरातील मुरमाडी व खुटसावरी पशुचिकित्सालयातर्फे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री राठोड तथा डॉ.लता देशमुख यांनी शासनाच्या या योजनेची अंमलबजावणी मचारणा व खुटसावरी पासून सुरु केली आहे.

Web Title: Now the base of the animals