भंडारा : गोसीखुर्द आणि बावनथडी या सिंचन प्रकल्पामध्ये अधिग्रहित केलेल्या गावांचे जिथे पुनर्वसन केलेले आहे अशा पुनर्वसित गावांना महसूली दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सदर मसूद्यासंबंधी ज्या व्यक्तींना हरकती आहेत. त्यांनी हरकती व सूचना २२ जुलै २०१४ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे. गोसीखुर्द प्रकल्पामध्ये भंडारा तालुक्यातीलपुनर्वसित गावे इटगाव, मकरधोकडा, गोरगाव बु., पिपरी, संगम, बेरोडी, सुरेवाडा, सिरसघाट, टेकेपार, अर्जूनी, जुनी टाकळी, पवनी तालुक्यातील मालची, पात्री, मेंढा, सौंदड, खापरी या पंधरा पुनर्वसित गावांना स्वतंत्र गावांचा दर्जा देण्यात येणार आहे. बावनथडी प्रकल्पामध्ये तुमसर तालुक्यातील पुनर्वसित सुसुरडोह या गावाला सुद्धा महसूली दर्जा देण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही प्रकल्पामधील पुनर्वसित गावांबाबत काही हरकती व सुचना असल्यास २२ जुलै २०१४ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे. (प्रतिनिधी)
पुनर्वसित गावांसाठी अधिसूचना जारी
By admin | Updated: July 16, 2014 23:56 IST