पुरेशा निधी मिळाला नाही तर संघर्षाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:39+5:302021-03-06T04:33:39+5:30
विदर्भ-मराठवाडा वैज्ञानिक मंडळावरून सदस्य विधान परिषदेत आक्रमक झाले. प्रादेशिक अनुशेष वाढत आहे. विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला जातो, असा आरोप ...

पुरेशा निधी मिळाला नाही तर संघर्षाची तयारी
विदर्भ-मराठवाडा वैज्ञानिक मंडळावरून सदस्य विधान परिषदेत आक्रमक झाले. प्रादेशिक अनुशेष वाढत आहे. विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला जातो, असा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या मागणीचा उल्लेख करीत तूर्तास अर्थसंकल्पात विदर्भ व मराठवाड्यास पूर्ण निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. विदर्भ मराठवाड्याच्या जनतेला १२ आमदार नियुक्त होत नाही म्हणून वेठीस धरण्याची किंमत मोजावी लागेल, असे सांगत सरकारी धोरणाचा निषेध करण्यात आला. सरकारने तात्काळ महामंडळांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवावा आणि दोन्ही विभागाच्या वाट्याचा निधी वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली. आमच्या भागावर अन्याय झाला तर संघर्षाला आम्ही कमी पडणार आणि आमच्या हक्काचा निधी घेऊनच, असा इशारा आमदार डॉ. फुके यांनी यावेळी दिला.