शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हिरकणी कक्ष नव्हे हे तर गोदामच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:58 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय वापरण्याचे आवाहन करणारी जाहिरात दूरचित्रवाहिन्यांवर दाखवली जाते. परंतु स्तनदा मातांसाठी सुरू केलेल्या ‘हिरकणी कक्ष’ वापराची जागृती करण्यासाठी राज्य सरकारकडून काहीही केले जात नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय वापरण्याचे आवाहन करणारी जाहिरात दूरचित्रवाहिन्यांवर

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय वापरण्याचे आवाहन करणारी जाहिरात दूरचित्रवाहिन्यांवर दाखवली जाते. परंतु स्तनदा मातांसाठी सुरू केलेल्या ‘हिरकणी कक्ष’ वापराची जागृती करण्यासाठी राज्य सरकारकडून काहीही केले जात नसल्याचे समोर आले आहे. भंडारा येथील एसटी बसस्थानकात हा कक्ष स्थापन केला, खरा परंतु त्याचा उपयोग केवळ गोदाम म्हणून केला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत उघडकीला आले.गुरूवारला दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास भंडारा बसस्थानकाची पाहणी करण्यात आली असता हिरकणी कक्षाचा दरवाजा अर्धवट सुरू असल्याचे दिसले. आत स्तनदा माता असतील, यामुळे सदर प्रतिनिधीने कक्षात प्रवेश केला नाही. मात्र कक्षातून एक सफाई कर्मचारी बाहेर आल्यानंतर त्याच्याशी चर्चा केली असता तेव्हा हिरकणी कक्षातील सत्य बाहेर आले. प्रतिनिधीने हिरकणी कक्षात प्रवेश केला असता, तिथे साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसून आले. एका कोपºयात एक पुरुष व दोन महिला सफाई कामगार जेवन करीत होते.दुसºया कोपºयात एक युवक खुर्चीवर बसून टेबलावरील पुस्तक वाचत होता. त्याच्याशी चर्चा केली असता त्या युवकाने सफाई कामगार असल्याचे सांगितले. आम्हाला कक्ष उपलब्ध नसल्यामुळे साफसफाईचे साहित्य या कक्षात ठेवले आहे. स्तनदा माता कक्षात आल्यानंतर आम्ही कक्षाबाहेर जातो, असे सांगितले.‘सबका साथ-सबका विकास’ अशी घोषणा करणाºया सरकारने महिलांच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये महत्त्वाचा असलेला ‘हिरकणी कक्ष’ ही केवळ जागृती आणि विश्वासार्हता नसल्याने दुर्लक्षित आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवास करणाºया अनेक महिलांना तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी बसण्याला जागा मिळत नाही. अस्वच्छतेमुळे आजूबाजूला तशी परिस्थितीही नसते. अशावेळी महिलांची कुचंबणा होते. पर्यायाने भुकेने बाळाचे हाल होतात. ही गरज ओळखून राज्यातील बसस्थानकात ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे. हा कक्ष कशासाठी? यासाठी त्यामध्ये ‘समानता’ ठेवण्यात आली. मात्र निरक्षरांनाही लक्षात यावे, यासाठी त्यावर हिरकणी कक्ष असल्याचे चित्र दिसून आले नाही.या कक्षाविषयी म्हणावी तेवढी जागृती न केल्याने असा कक्ष येथे आहे, याची माहितीच प्रवाशांना होत नसल्याचे पाहणीतून लक्षात आले. ज्यांना ते माहित आहे, त्यांच्या मनात या ठिकाणाविषयी विश्वासार्हता असणे आवश्यक आहे. ही विश्वासार्हता निर्माण करण्याला आणि मुळातच या कक्षाविषयी जागृती करण्याला महामंडळ कमी पडले आहे, यात तीळमात्र शंका नाही.हिरकणी कक्ष स्थापनेला तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र, कक्षामध्ये स्तनदा मातांचा ‘रिस्पॉन्स’ मिळत नाही. त्यांच्यासाठी एक खूर्ची व टेबलची व्यवस्था केली आहे. स्तनदा मातांना बसस्थानक प्रमुख मार्गदर्शन करीत असतात. कक्षामध्ये एका कोपºयात साहित्य ठेवले आहेत. स्तनदा मातांनी हिरकणी कक्षाचा लाभ घ्यावा.-फाल्गुन राखडे,आगार व्यवस्थापक, भंडारा़