भाजपचे फुके यांचा नामांकन दाखल
By Admin | Updated: October 30, 2016 00:28 IST2016-10-30T00:28:05+5:302016-10-30T00:28:05+5:30
भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार डॉ.परिणय फुके यांनी आज शनिवारला नामांकन ...

भाजपचे फुके यांचा नामांकन दाखल
विधान परिषद निवडणूक : तिहेरी लढतीची शक्यता
भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार डॉ.परिणय फुके यांनी आज शनिवारला नामांकन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशीवार, आ.संजय पुराम, आ.विजय रहांगडाले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, विनोद अग्रवाल, डॉ.परिणीता फुके या उपस्थित होत्या. त्यानंतर सभागृहात आयोजित सभेत ना.बडोले, खा.पटोले, आ.वाघमारे, विनोद अग्रवाल यांनी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य व पंचायत समिती सभापतींना पक्षाविषयी मार्गदर्शन केले.
या सभेतच विधान परिषद निवडणुकीत मतदान कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी विजयाचे समिकरण मतदारांसमोर मांडण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन हे उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसनेही तयारी केली असून प्रफुल्ल अग्रवाल हे उमेदवार राहणार आहेत. ह्य
त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यास कोण कोणावर भारी ठरणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)