कोरोनाचा एकही रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये

कोरोनाचा एकही रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये

ठळक मुद्देशिल्पा सोनाले : ग्रामीण रूग्णालयाला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. अशात एकही रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये असे आदेश उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी दिले.
शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले. पुढे बोलताना त्यांनी तालुका प्रशासन कोरोनाला रोखण्याकरीता सतत प्रयत्नशील आहे. प्रशासनाने काढलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यात येत असल्याचे सांगीतले. सोनाले यांनी, संपूर्ण तालुक्याचा दौरा करीत तालुका प्रशासनातर्फे काय काय उपाययोजना करण्यात येत आहे व रूग्णांना कितपत सुविधा ग्रामीण रूग्णालयातर्फे पुरविल्या जात आहेत.नगरपंचायत शहरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोणत्या उपाययोजना शहरातील लोकांकरीता करण्यात येत आहेत हे जाणून घेतले. दरम्यान, त्यांनी प्रभाग क्रमांक-१५ मध्ये अनेक घरांना भेट दिली व संवाद साधला. याप्रसंगी नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक मेश्राम, कर वसुली अधिकारी नायगवळी, नगरपंचायत कर्मचारी नंदू गहाणे, ग्रामीण रूग्णालयातील डॉ. प्राजक्ता राऊत, डॉ. भूते उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी वैद्यकीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना संदर्भात उपाययोजनांची माहिती घेतली.

Web Title: No patient should be deprived of corona treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.