शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रन्ट अन् सुरक्षेचीही हमी नाही; लक्तरे वेशीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 03:01 IST

अंतर्गत विभागाचे ऑडिटही संशयाच्या भोवऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभाग आहेत. त्यात दंतरोग विभाग, नेत्रविभाग, शस्रक्रिया विभाग, आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग असे महत्त्वपूर्ण विभाग आहेत

इंद्रपाल कटकवारभंडारा : दहा निरागस बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर शासन, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एकेक करीत रुग्णालयातील हलगर्जी चव्हाट्यावर येत आहे. अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला असला तरी त्यासोबतच इतर अन्य बाबीही नकारात्मकच आहेत. ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रन्ट अन् सुरक्षेची कोणती हमीही नाही, अशीच अवस्था दिसत आहे. या घटनेने जिल्हा रुग्णालयाची लक्तरे देशपातळीवर टांगली गेली असून, विभागनिहाय ऑडिटचा मुद्दाही आता पुढे येत आहे. विशेष म्हणजे दशकभरात या रुग्णालयाचे कितीवेळा फायर ऑडिट झाले याची शहानिशा करणे महत्त्वाचे आहे.   

अंतर्गत विभागाचे ऑडिटही संशयाच्या भोवऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभाग आहेत. त्यात दंतरोग विभाग, नेत्रविभाग, शस्रक्रिया विभाग, आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग असे महत्त्वपूर्ण विभाग आहेत. या विभागांचे वर्षनिहाय ऑडिट होणे आवश्यक असते. फायर ऑडिटही त्यातीलच एक प्रकार आहे. परंतु अंतर्गत विभागाचेही असे कोणतेच ऑडिट झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. 

...तर १० चिमुकल्यांचे जीव वाचले असतेn ४०० खाटांचे रुग्णालय असलेल्या या परिसरात किती वेळा फायर ड्रील झाली, याची माहिती कुणाकडेच नाही. खरे तर एकदाही फायर ड्रील झाली नाही, असे दबक्या आवाजात सांगितले जाते. फायर हायड्रन्ट आणि स्मोक अलार्म यंत्रणाही येथे कार्यान्वित नाही. यापैकी कोणतीही एक यंत्रणा असती तर त्या दहा चिमुकल्यांचे प्राण वाचले असते.  n कोवळी पाखरे उमलण्यापूर्वीच कोमेजली. याला जबाबदार कोण, याचा शोध उच्चस्तरीय समिती घेत आहे. त्यातून खरे कारणही पुढे येईल, दोषींना शिक्षाही होईल; परंतु त्या निरागस बालकांचे जीव परत मिळणार नाही. 

 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगMaharashtraमहाराष्ट्र