शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टाकीला झाकणच नाही: साकोलीच्या एसटी आगारातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:22 IST

Bhandara : एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ, प्यायला मिळतेय दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भंडारा विभागात सहा आगार आहेत. यापैकी साकोली आगार सर्वांत जास्त नफा मिळवून देणारे आगार आहे. परंतु येथील कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे वाहन चालक व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तापमानामध्ये वाढ झालेली असते. त्यामुळे सर्वांना पिण्याचे थंड पाणी आवश्यक असते; परंतु येथील कर्मचारी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी शाखा व्यवस्थापकाने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नसल्यामुळे पाण्याची बॉटल घरूनच घेऊन यावे लागत आहे. आगारातर्फे कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु पाण्याची टाकी स्वच्छ नसल्यामुळे व टाकीला कुठलेही झाकण नसल्यामुळे टाकीमध्ये कचरा पडलेला असतो.

 

परिणामी, पाण्याची अस्वच्छता वाढली आहे. याबाबत आगारप्रमुखांना कर्मचाऱ्यांनी अनेकदा सांगितले; परंतु आगारप्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पाण्याची टाकी अजूनही उघडीच व स्वच्छता न करता 'जैसे थे' स्थितीत आहे. अस्वच्छ पाणी कर्मचाऱ्यांना प्यावे लागत आहे. त्यामुळे कर्मचारी आजारी पडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न कायम आहे. शेकडो प्रवाशांना एसटीतर्फे सेवा दिली जाते; परंतु कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित नाही, असेच दिसून येत आहे. या संदर्भात आगार प्रमुखांसोबत संपर्क होऊ शकला नाही.

 

...तर जबाबदार कोण?कर्मचारी स्वस्थ राहतील, तर प्रवासीही सुरक्षित राहतील, ही साधी गोष्ट अधिकाऱ्यांना अद्यापही समजलेली दिसत नाही. आरोग्य बिघडून एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी स्वच्छ करावी. टाकीला झाकण बसवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईbhandara-acभंडारा