शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२ वर्ष लोटूनही नुकसान भरपाई नाही; शेतकरी अर्धे उपाशी, अर्धे तुपाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:26 IST

तहसील कार्यालयात फेऱ्या : २०२२-२३ अवकाळीची आर्थिक मदत अडली

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी सन २०२२-२३च्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची केवायसी पूर्ण केली. केवायसी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना भेदभाव पूर्ण आर्थिक मदत देण्यात आली आहे. यात अर्धे शेतकरी तुपाशी आणि अर्धे शेतकरी उपाशी, असे चित्र आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांचे बचत खात्यात नुकसानभरपाई देण्यात आली आहे. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांच्या फेऱ्या तहसील कार्यालयात वाढलेल्या आहेत.

२०२२-२३ कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तलाठ्यांनी केल्यानंतर शासनस्तरावरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये शेतकऱ्यांचे केवायसी करण्यासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यादीत नावे असल्याने शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे. दरम्यान, केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्यात जानेवारी २०२५च्या पहिल्या आठवड्यात आर्थिक मदत देण्यात आली आहे. परंतु सोबतच केवायसी पूर्ण केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचे बचत खात्यात फेब्रुवारीतही आर्थिक मदत देण्यात आली नाही. अल्प नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जलद गतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. परंतु सर्वाधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठेंगाच दाखविण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. मदतीसंदर्भात कर्मचाऱ्याकडून टोलवाटोलवी केली जाते. 

पुराच्या याद्या खोळंबल्यासन २०२४ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यांत तीनदा पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या धान पिकात शिरले होते. धान पिकांचे नुकसान झाले. तलाठ्यांनी पंचनामे केले. याद्या महसूल विभागाला देण्यात आलेल्या आहेत. परंतु याद्या परत केवायसी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना केवायसीसाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याने मदतीची अपेक्षा करणे गैर आहे. यामुळे तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी आहे.

पीक कर्जाचे टेन्शनमार्चअखेरीस पीक कर्ज भरण्याचे टेन्शन शेतकऱ्यांना आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. पुन्हा उन्हाळी धान पिकांचे ओझे आले. खर्च वाढले. महिनाभरानंतर पीक कर्ज भरण्याचे टेन्शन वाढणार आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही, नुकसानभरपाई मिळाली नाही. शासनाने हातच ओढले असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत फेब्रुवारी महिन्यात देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbhandara-acभंडारा