आता वर्षातून आठ वेळा होणार निराधार योजनेच्या बैठका
By Admin | Updated: August 12, 2015 00:36 IST2015-08-12T00:36:57+5:302015-08-12T00:36:57+5:30
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी घेणारा विलंब टाळण्यासाठी यापुढे निराधार समित्यांच्या...

आता वर्षातून आठ वेळा होणार निराधार योजनेच्या बैठका
सामाजिक न्याय विभागाचे आदेश : इनकॅमेरा होणार चित्रीकरण
लाखांदूर : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी घेणारा विलंब टाळण्यासाठी यापुढे निराधार समित्यांच्या बैठका वर्षभरातून किमान आठ वेळा ठरवून दिलेल्या तारखेना घेण्याचे सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. या बैठकीचे इनकॅमेरा चित्रीकरण करण्यासाठी तहसिलदार यांना २० हजार रुपयाचा कॅमेरा घेण्याची मुभाही देण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेतून वंचीत लोकांना दरमहा निश्चीत वेतन देण्यात येते. या योजनेतून लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर त्यांना दोन ते तीन वर्षानंतरही या योजनेचा लाभ मिळत नसल्याची बाब समोर आल्याने सामाजिक न्याय विभागाने निर्णय घेवून मार्गदर्शन सुचना दिल्या आहेत. यापूढे वर्षभरात निराधार समित्याच्या आठ बैठका यापुढील तारखेच्या दिवशी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यात ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, १० मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, ११ ते १४ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २७ मे रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी, २६ जून राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती, १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन, २ आॅक्टोंबर महात्मा गांधी जयंती आणि ६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा समावेश राहणार आहे.
या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी किंवा अन्य रजा येत असल्यास या तारखेच्या पूर्वीच्या किंवा नंतरच्या तीन दिवसाची तारीख निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बैठकीस गैरहजर राहिल्यास किंवा उपस्थिती दर्शविण्यास असमर्थता दाखविल्यास तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठका घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. ठरवुन दिलेल्या तारखेस बैठकी घेण्यात संपूर्ण जबाबदारी तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे, या दरम्यान, बैठका न झाल्यास तहसिलदारांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केले आहे, बैठकीचे इनकॅमेरा चित्रीकरण घेणार असल्याने या कामात गती येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)