नऊ दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

By Admin | Updated: March 4, 2017 00:21 IST2017-03-04T00:21:56+5:302017-03-04T00:21:56+5:30

दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असतानाच पोलिसांनी ९ दुचाकी चोरुन नेणाऱ्या २३ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.

Nine bike stolen police nets | नऊ दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

नऊ दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भंडारा : दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असतानाच पोलिसांनी ९ दुचाकी चोरुन नेणाऱ्या २३ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.
शुभम उदाराम ढोमणे रा. आंबेडकर वॉर्ड बेला असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. विगत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात दुचाकी चोरींच्या घटनामध्ये वाढ झाली होती. मात्र चोरट्याना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. अखेर पोलीस भंडारा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचा-यांनी दूचाकी चोरट्यांचा शोध घेऊन तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरविली. शुभम ढोमणे हा सराईत दुचाकी चोरटा अखेर पोलिस जाळ्यात अडकला.
त्याच्या विरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ९ दुचाकी जप्त केल्या असून त्याची किंमत ५ लाख ८५ हजार सांगण्यात येते. त्याच्याकडून पुन्हा काही दूचाकी चोरीच्या घटना उघडकीस येवू शकतात, असा कयासही पोलीस अधिका-यांनी केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक वनिता शाहू, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीपान उबाडे, हवालदार पुरुषोत्तम शेंडे, रवि भोगे, सुभाष राठोड, नायक प्रशांत गुरव, दिनेश गलुले, शिपाई रमेश बेदरकर, विजय तायडे यांनी पार पाडली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Nine bike stolen police nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.