भंडारा : तालुक्यातील चिखली येथे आयोजित कार्यक्रमात मानवता हायस्कूल येथील सहायक शिक्षक तथा ठाणा पेट्रोल पंप येथील रहिवासी कल्याणी निखाडे व सातोना येथील शिक्षक सचिन तिरपुडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. चिखली येथील युवराज गायधने यांच्या हस्ते त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात तानाजी गायधने, भंडारा तालुका भाजपा महामंत्री विष्णू हटवार, कैलास मेहर, रोहित हटवार, खेमराज वाघमारे, निखिल वाघमारे, रोहित चरडे, युगल हटवार, आकाश वाघमारे, शिवदास हटवार, सचिन हटवार, नेपाल गायधने, ओमप्रकाश वाघमारे, नारायण शहारे, नरेंद्र वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कल्याणी निखाडे यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याबद्दल कैलास मेहर यांनी माहिती दिली. संचालन तानाजी गायधने यांनी केले तर आभार युगल हटवार यांनी मानले.
निखाडे यांचा चिखली येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST