गोल्ड प्लेटेट बांगड्यांचे वितरण पुढील टप्प्यात
By Admin | Updated: August 10, 2015 00:26 IST2015-08-10T00:26:32+5:302015-08-10T00:26:32+5:30
लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सुवर्णस्पर्श गोल्ड प्लेटेट बांगड्यांचे वितरण पुढील टप्प्यात केले जाणार आहे.

गोल्ड प्लेटेट बांगड्यांचे वितरण पुढील टप्प्यात
सखी मंच उपक्रम : तालुकास्थळी होणार वाटप
भंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सुवर्णस्पर्श गोल्ड प्लेटेट बांगड्यांचे वितरण पुढील टप्प्यात केले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि.१०) रोजी बांगड्यांचे वितरण सुवर्णस्पर्श या व्यवस्थापनेतील तांत्रिक कारणांमुळे स्थगित करण्यात आले आहे.
बांगड्यांचे वितरण लवकरच करण्यात येणार असून त्याची तारीख प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्थळावर सखींना बांगड्यांचे वितरण त्यांच्याच तालुक्यात ठरलेल्या तारखेत तालुका संयोजिकांकडून करण्यात येईल. यासंबंधी येणाऱ्या वेळेत प्रसिद्धीतून लवकरच माहिती कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय प्रमुख मोहन धवड, लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांच्याशी संपर्क साधता येईल. (मंच प्रतिनिधी)