वृत्तपत्र विक्रेतांच्या समस्या मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:48 IST2019-01-12T21:48:44+5:302019-01-12T21:48:59+5:30
सूर्य उगवण्याच्या पूर्वी सर्वांच्या घराघरात वर्तमानपत्र टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेतांच्या नानाविध समस्या जैसे थे आहेत. त्यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली. मात्र अजूनपर्यंत वृत्तपत्र विक्रेतांची दखल घेतली नाही.

वृत्तपत्र विक्रेतांच्या समस्या मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सूर्य उगवण्याच्या पूर्वी सर्वांच्या घराघरात वर्तमानपत्र टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेतांच्या नानाविध समस्या जैसे थे आहेत. त्यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली. मात्र अजूनपर्यंत वृत्तपत्र विक्रेतांची दखल घेतली नाही. त्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन मुखमंत्र्यांना त्यांच्या कळविणार असल्याचे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
तुमसर येथे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वार्षिक सत्कार व स्नेह मिलन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर जिल्हा संघटनेचे किशोर मोरे, विजय निर्वाण, सत्कारमूर्ती दयाराम थोटे, बंडू वनवे, नारायण उके उपस्थित होते
सत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. संचालन व आभार गणेश बर्वे यांनी केले.
कार्यक्रमासाठी संजीव थोटे, विजय मेश्राम, माणिकचंद टेंभरे, कृष्णकांत बडवाईक, लीलाधर मेश्राम, नितीन खोब्रागडे, विनोद मेश्राम, रवी साठवणे, जीवन वनवे सुरेंद्र लाडसे यांनी प्रयत्न केले.