बातमीत 'बात' असावी 'मी' पणा नसावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:00 IST2019-01-09T21:59:53+5:302019-01-09T22:00:20+5:30
पत्रकांरानी बातमी लिहितांनी वास्तविकतेचा भान ठेवून मुळ गाभ्याला बगल देऊ नये, खरेपणा टिकवावा. बातमीत बात असावी, परंतु मी पणा नसावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांनी व्यक्त केले.

बातमीत 'बात' असावी 'मी' पणा नसावा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पत्रकांरानी बातमी लिहितांनी वास्तविकतेचा भान ठेवून मुळ गाभ्याला बगल देऊ नये, खरेपणा टिकवावा. बातमीत बात असावी, परंतु मी पणा नसावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांनी व्यक्त केले.
पत्रकार असोसिएशन तुमसर तर्फे आयोजित भारतीय प्रसार माध्यमांची नेमकी भूमिका काय विषयावर आयोजित तुमसर येथील मातोश्री सभागृहात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार सुचिता राहाटे होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे होते.
कमलेश सुतार म्हणाले, बातमी करतानी नि:ष्पक्ष तथा समाजाचे हित जोपासून समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करावा. बातमीची चर्चा घेण्यापेक्षा तिचे गांभीर्य सर्वसामान्यांना कळले पाहिजे. बातमीचा परिणाम होण्याइतकी ती परिणामकारक असावी. कुणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये पत्रकाराची कलम कधीच बळी पडत नाही. समाजातील प्रत्येक जण आज पत्रकार आहे. सोशल मिडियाचा वापर प्रत्येकजन करून आपले विचार कोट्यवधी लोकापर्यंत पोहचवू शकतात. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचा उपयोग प्रत्येकांनी करावा, असे आवाहन सुतार यांनी केले.
सुचिता दहाटे लेखन स्वातंत्र्याचा उपयोग पत्रकारांनी करतानी समाजमनाचा विचार नक्कीच केला पाहिजे. समस्येला प्रथम प्राधान्य देऊन सामाजिकता जोपासणे आज काळाची गरज आहे. पत्रकार निडर असावा. मात्र नक्कीच बांधीलकी जपणारा असावा. ग्रामीण पत्रकारीता आज नावारूपाला आली आहे. त्यांनी महत्त्वपूर्ण विषयाला न्याय दिला पाहिजे.
यावेळी तुमसरचे माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे, जगदीशचंद्र कारेमोरे, विजयकुमार डेकाटे तथा विद्यमान नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांचा पत्रकार संघातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनीही पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक पत्रकार असोसिएशन, तुमसरचे अध्यक्ष गणेशराव बर्वे, संचालन मोहन भोयर तर आभार चैनलाल परिहार यांनी मानले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोेरे, डॉ. पंकज कारेमोरे, कल्याणी भुरे, राजकुमार माटे, विठ्ठलराव कहालकर, सुधाकर कारेमोरे, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, योगेश सिंगनजुडे, नगरसेवक सुनील पारधी, मेहताबसिंग ठाकूर, पंकज बालपांडे, शोभा लांजेवार, सुलभा हटवार, गायत्री बुराडे, डॉ. राहुल भगत, डॉ. उबाळे, अॅड. तिमांडे, प्रा. भुतांगे, प्रा. कमलाकर तिरकडे, प्रा. संजय बुराडेसह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी पत्रकार मनोहर बिसने, प्रविण तांडेकर, अमीत रंगारी, महेश गायधने, संजय गायधने, रामचंद्र करमकर, सिराज शेख, सुरेंद्र पारधी, सदाशिव ढेंगे, देवा मेश्राम, सुधीर गोमासे, बालकदास ठवकर, काका भोयर, ज्ञानेश्वर ठवकर, शैलेश बन्सोड, नितीन लिल्हारे यांच्या मोहाडी व तुमसर येथील पत्रकारांनी परिश्रम घेतले.