युवकांना नवीन रोजगार संधी रेडिओ जॉकी -भोयर
By Admin | Updated: August 30, 2014 01:37 IST2014-08-30T01:37:27+5:302014-08-30T01:37:27+5:30
भारतात रोजगारा करीता विविध क्षेत्र उपलब्ध आहेत. परंतू युवकांना याची परिपूर्ण माहिती मिळत नाही. ज्या क्षेत्राबद्दल माहिती आहे त्यात टोकाची स्पर्धा सुरू आहे.

युवकांना नवीन रोजगार संधी रेडिओ जॉकी -भोयर
पवनी : भारतात रोजगारा करीता विविध क्षेत्र उपलब्ध आहेत. परंतू युवकांना याची परिपूर्ण माहिती मिळत नाही. ज्या क्षेत्राबद्दल माहिती आहे त्यात टोकाची स्पर्धा सुरू आहे. या कार्यशाळेतून जिल्ह्यात खास करून ग्रामीण विद्यार्थ्यांला लोकमत युवा नेक्स्टच्या माध्यमातून आर जे म्हणजे रेडीओ जोकी या आधुनिक क्षेत्राबद्दलही माहिती मिळाली. त्यांनी त्या क्षेत्राकडे रोजगाराची नवीन संधी म्हणून पाहावे. आमचा विद्यार्थी महाविद्यालयाच्या मंचावर येवून स्पर्धेला सामोरे जाताना त्याच्या मनात येणारी भिती या कार्यक्रमामुळे नक्कीच दूर झाली, असे मला गर्वाने सांगावेसे वाटत आहे, असे मत आर जे हंट व सेमीनार या कार्यक्रमवेळी शशीकांत भोयर यांनी व्यक्त केले.
लोकमत युवानेक्स्ट, युवा शक्ती संघटना, पीएसएस कॉलेज पवनीतर्फे आरजे हंट व सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. युवा शक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष शशीकांत भोयर पीएस कॉलेजचे प्राचार्य जीएस लांबे पवनी वार्ताहर अशोक पारधी, रेडीओ सिटीचे आर जे अंकीत अग्रवाल युवा शक्तीचे कार्यकर्ते अशोक भिवगडे, राहुल अवसरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वल करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमात आर जे अंकीत अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना रेडिओ जोकीबद्दल मार्गदर्शन करताना या क्षेत्रात करीअर संधी उपलब्ध आहेत हे सांगितले. भारतात ८३४ रेडिओ स्टेशनला शासन मान्यता आहे. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी डिप्लोमा इन आर जे पदवीनंतर डिग्री कोर्स व पी.जी. कोर्स पण उपलब्ध आहे, असे मार्गदर्शन केले. प्राचार्य जी.एस. लांबे यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. त्यात त्यांनी युवांना प्रोत्साहित केले.
आयोजित आर जे हंट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी महेश मुंडले यांनी पटकाविला तर द्वितीय चेतना तिघरे यांनी मिळवला, तृतीय क्रमांकासाठी प्रशांत रहाटे यांची निवड करण्यात आले. विजयी स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेत श्रेया खापरडे, ममता मेश्राम यांनीही उत्कृष्ट प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक शिंगाडे यांनी केले तर प्रास्तावना पवनी वार्ताहर अशोक पारधी यांनी केले. युवा नेक्स्ट जिल्हा संयोजिका ग्रिष्मा खोत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात आयोजक म्हणून महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व युवा शक्ती संघटना यांनी योगदान दिले. प्राध्यापक शिंगाडे, लतीशा खोत, शरयु टाकलकर, शुभम पुरणीक व महाविद्यालयीन विद्यार्थीनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)