भंडाऱ्यात नेत्रजागृती मार्गदर्शन शिबिर
By Admin | Updated: September 6, 2014 01:35 IST2014-09-06T01:35:16+5:302014-09-06T01:35:16+5:30
लोकमत सखी मंच व इंद्राक्षी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजीव गांधी चौक स्थित इंद्राक्षी ...

भंडाऱ्यात नेत्रजागृती मार्गदर्शन शिबिर
भंडारा : लोकमत सखी मंच व इंद्राक्षी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजीव गांधी चौक स्थित इंद्राक्षी नेत्रालयात विविध स्पर्धा व नेत्रजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणञयात आले आहे.
शहरातील सखी, युवती व महिला स्पर्धेत नि:शुल्क सहभागी होऊ शकतील. स्पर्धेअंतर्गत सखींना घरूनच मोदक तयार करून व रेसेपी लिहून आणावयाची आहे.
डोळ्यांचा सुष्कपणा, खाज डोळ्यांचे विकार, आजार, मोतीबिंदू, काचबिंदू मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे डोळ्यांवर होणारा विपरीत परिणाम, उपाययोजना व औषधांनी चष्मा दूर करण्यासारख्या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनावरच आधारित प्रश्न विचारण्यात येईल. अचूक उत्तर देणाऱ्या सखीला प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरळ प्रवेश देण्यात येईल. विजयी स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधता येईल. (मंच प्रतिनिधी)