नेरला लिफ्ट एरिगेशन अभावी शेतकरी संकटात
By Admin | Updated: February 18, 2015 00:31 IST2015-02-18T00:31:13+5:302015-02-18T00:31:13+5:30
ग्रामीण भागाचा आर्थिक विकास हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतातील उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने हरितक्रांतीचे स्वप्न बघून या परिसरात नेरला लिफ्ट एरिगेशन सुरु करण्यात आली.

नेरला लिफ्ट एरिगेशन अभावी शेतकरी संकटात
किटाळी : ग्रामीण भागाचा आर्थिक विकास हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतातील उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने हरितक्रांतीचे स्वप्न बघून या परिसरात नेरला लिफ्ट एरिगेशन सुरु करण्यात आली. मात्र ती बंद असल्याने शेतकऱ्यांवर पीक करपण्याचे संकट ओढावले आहे.
शेतातील पीक उत्पादन सुदृढ तर शेती एखाद्यावर्षी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यास नुकसान होऊ शकतो. शेकडो हेक्टर शेतीतील उभे पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावते. सिंचन व्यवस्थेचे महत्त्व लक्षात घेऊन या परिसरात लिफ्ट एरिगेशनचे काम करण्यात आले. मात्र लाखो रुपये खर्च होऊनही ही योजना बंद अवस्थेत आहे.
अड्याळ, पालांदूर, पोहरा, लाखनीसह परिसरातील शेतकऱ्यांना नेरला लिफ्ट एरिगेशनचा फायदा होणार आहे. मात्र पाणी नसल्याने अनेकांची शेती संकटात सापडली आहे. संथगतीने सुरु असलेले काम शासनाने त्वरित पूर्णत्वास नेऊन परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)