श्री पध्दतीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: August 5, 2016 00:43 IST2016-08-05T00:43:34+5:302016-08-05T00:43:34+5:30
शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या पीक उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, याकरिता विविध उपाययोजना असून त्यांची प्रसिध्दी करण्यात येते.

श्री पध्दतीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष
योजनांची प्रसिध्दी कागदावरच : अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत
साकोली : शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या पीक उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, याकरिता विविध उपाययोजना असून त्यांची प्रसिध्दी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना ते मान्य नाही किंवा अडचणी येत असल्याने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
श्री पध्दतीने शेती करावी त्यातुच ठरले वेळेची धानाची बचत होऊन दीड पटीने उत्पादनात वाढ होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. तसेच कृषी विभागाचे कर्मचारी श्ोतात जाऊन श्री पध्दतीने लागवड करण्याविषयी मार्गदर्शन करतात. पण शेतकरी ऐकण्यास तयार नाही. यावरुन श्री पध्दती शेतकऱ्यांसाठी वरदान असली तरी शेतकऱ्याच्या दृष्टीने ती कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. शेतकरी श्री पध्दतीचा वापर करण्यास इच्छुक नाहीत याबाबतची माहिती काढली असता श्री पध्दतीला वातावरणाची मोकळीकता हवी. रोवणी करणाऱ्या मजुरांची संख्या अधिक पाहिजे, मात्र यावेळी पावसाच्या भितीने रोवणीला उशीर झाल्याने सर्वच शेतकरी कामाला लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात रोवण्या सुरु असल्याने एक दोन महिलाच रोवणीची कामे करीत आहेत. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी किंवा अधिकारी शेतीतज्ज्ञ अशा कोणाचाही सल्ला ऐकण्यास शेतकरी तयार नाही. श्री पध्दतीने रोवणी करण्याचा गाजावाजा कृषी विभाग नेहमी करत असतो. याचे फायदे दिसून येतात. शेतकरी कोणत्याही माध्यमाची ऐकुण घेण्यास तयार नाही. कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक आदी मंडळ अधिकारी यांना शेतकरी उलटसुलट बोलुन आपला संताप व्यक्त करीत असल्याचे दिसून येते.
बळीराजा निसर्गाच्या प्रकोपामुळे वाढत्या महागाईमुळे आणि मजुरांच्या टंचाईमुळे पुर्वीपासुनच घाबरलेला आहे. यावेळी पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची शुध हरपली असतांना थोडासा दिलासाही मिळाला आहे.
आता बांध्यातील पाणी संपु नये याकरिता जेवढे रोपे लावून होतील तेवढे लावण्याचा प्रयत्न घाईगडबडीत केल्या जात आहे. श्री पध्दतीला पाहिजे तसा प्रतिसाद कृषी विभागाला मिळेल असे दिसून येत नाही. कृषी विभागाने श्री पध्दतीचा प्रचार व प्रसार केला त्यानुसार श्री पध्दतीचे पीकक्षेत्र भरपूर वाढले, अशी अपेक्षा मात्र कमी पाऊस व भारनियमन यावर्षी या पध्दतीचा शाप ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी )