शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध व आंबेडकरांच्या विचारांची जगाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:46 IST

शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शिल, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली.

ठळक मुद्देनीळकंठ कायते : खुटसावरी येथे बुद्ध व बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या छताचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शिल, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली. या दोन्ही महामानवांच्या विचारांची गरज जगाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते यांनी केले.भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या छताच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला आदिशक्ती दुग्ध उत्पादक सहकारी संस्था टेकेपारच्या अध्यक्ष भुवनेश्वरी कायते होत्या. अतिथी म्हणून सरपंच विजय वासनिक, उपसरपंच सुरेश उईके, ग्रामसेवक चेटुले, छाया वाहाने, प्रियंका टेंभुर्णे व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.भूवनेश्वरी कायते यांनी भीमसैनिकांनी संघटीत होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक विचारांचा प्रसार करावा असे आवाहन केले.यावेळी उपस्थित अतिथींनी तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अमरदीप बोरकर यांनी तर, आभार प्रदर्शन बाबुलाल वासनिक, डॉ.नरेश साखरे यांनी केले. कार्यक्रमासाठी मारोती करवाडे, निवांत वासनिक, अमरदीप बोरकर, दिलीप साखरे, धनश्री रामटेके, अविनाश बोरकर, बित्सोक साखरे, दीपक भोयर, नंदकुमार साखरे, शशीकांत वाहने, मनोज वासनिक, विनोद बोरकर, सुदर्शन वासनिक, संगीता बोरकर, अबोली वाहने, ज्योती नंदेश्वर, प्रीती मेश्राम, रसिका करवाडे, कलाबाई बोरकर, सुलोचना बोरकर, अश्विनी बोरकर, शिल्पा कांबळे, शुद्धमता बोरकर, वर्षा बडोले, शिला साखरे, निर्मला वासनिक, यशोधरा वासनिक, रमाबाई दिनकर, वच्छला साखरे, प्रियंका वासनिक, अनन्या वाहने, दर्शना मेश्राम, नितेश दिनकर, जितेंद्र वासनिक, फुलचंद वासनिक, मयूर रामटेके, सुशील वासनिक यांच्यासह पंचशील बौद्ध विहाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा