समाजात एकजूट गरजेची
By Admin | Updated: September 1, 2014 23:21 IST2014-09-01T23:21:32+5:302014-09-01T23:21:32+5:30
अखिल भारतीय शाहू समाज तेली महासभा प्रत्येक प्रांतात कार्य जोमाने करीत आहे. त्यामुळेच तेली समाजाचे प्रतिनिधी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, केरळ, गुजरात येथून निवडून आलेले आहेत.

समाजात एकजूट गरजेची
तेली समाजाची सभा : कृष्णराव हिंगणकर यांचे प्रतिपादन
भंडारा : अखिल भारतीय शाहू समाज तेली महासभा प्रत्येक प्रांतात कार्य जोमाने करीत आहे. त्यामुळेच तेली समाजाचे प्रतिनिधी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, केरळ, गुजरात येथून निवडून आलेले आहेत. भारतात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून काम सुरु आहे. आपला जिल्हा भंडारा सुद्धा समाज संघटनेत मागे राहू नये, यासाठी सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर समित्या तयार करून संघटन मजबूत करावे, असे आवाहन कृष्णराव हिंगणकर यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष देवीदास लांजवोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
सभेला महासचिव कृष्णराव हिंगणकर तसेच महाराष्ट्र तेली समाज महासभेचे विभागीय अध्यक्ष अॅड. धनराज खोब्रागडे, विभागीय उपाध्यक्ष सरिता मदनकर, जिल्हा महिला अध्यक्षा कुंदा वैद्य, सेवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास शहारे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदिप शहारे, रामू शहारे उपस्थित होते.
सभेत समाजाचे संघटन व समाजाच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. समाजाचे हित लक्षात घेता एकसंघ राहण्याकरिता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार यांनी प्रस्ताविकात समाजाचे हित समाज संघटनेचे महत्व सांगून समाजाने व कार्यकर्त्यांनी आपसात मेळ ठेवून समाजाची उन्नती, प्रगती करावी असे सांगितले.
समाजात एकजुट असली तर विकास शक्य होतो. प्रगतीकडे जाण्याची दिशा निश्चित होते. त्यामुळे समाजबांधवांनी हेवेदावे सोडून एकजुट व्हावे, असे आवाहन अॅड.धनराज खोब्रागडे यांनी केले.
यावेळी सरिता मदनकर, कुंदा वैद्य, सुदिप शहारे, धनराज साठवणे, जाधवराव साठवणे, शंकरराव चांदेवार, ग्यानीराम साखरवाडे यांचीही भाषणे झाली. यावेळी श्रीराम मस्के राष्ट्रीय कार्यकारिणीचे नियमित सभासद झाले. त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
सभेचे संचालन कार्याध्यक्ष नेहालचंद पाटील यांनी व आभार नितीन मलेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अरविंद लांजेवार, अनिल भुरे, प्रेमसागर वैरागडे, दिनेश भुरे, दिलीप माकडे, अवधुत रघुते, जाधवराव साठवणे, गुणवंत क्षीरसागर, पुरुषोत्तम वैद्य, राजू धुर्वे, सुयेश कारेमोरे, सुरेंद्र सेलोकर, रामू शहारे, विवेक नखाते, मनोहर साठवणे, मधुकर बांगडकर, ज्ञानेश्वर वैद्य यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)