प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी वृक्ष लागवड गरजेचे

By Admin | Updated: October 1, 2014 23:19 IST2014-10-01T23:19:03+5:302014-10-01T23:19:03+5:30

आजच्या विज्ञान युगात पर्यावरण विविध मार्गाने प्रदूषित होत आहे, तेव्हा प्रदूषण मुक्त पर्यावरण टिकवायचे असेल तर वृक्षलागवडी सोबतच त्यांचे संवर्धनही तेवढेच गरजेचे व आवश्यक आहे,

Need planting trees for pollution free environment | प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी वृक्ष लागवड गरजेचे

प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी वृक्ष लागवड गरजेचे

मासळ : आजच्या विज्ञान युगात पर्यावरण विविध मार्गाने प्रदूषित होत आहे, तेव्हा प्रदूषण मुक्त पर्यावरण टिकवायचे असेल तर वृक्षलागवडी सोबतच त्यांचे संवर्धनही तेवढेच गरजेचे व आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य जी.एन. टिचकुले यांनी केले.
सुबोध विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मासळ येथील वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला यादव घोनमोडे, सहादेव हुकरे, शत्रुघ्न नामुर्ते, रवींद्र घोनमोडे, नामदेव भुरे, दीपक घुगुसकर, विजय कुथे, विठ्ठल सार्वे, सुनील उरकुडे, रवींद्र पचारे, अनिल राखडे, विलास पचारे, लीलाधर जिभकाटे, धनराज गिऱ्हेपुंजे, हंसराज वैद्य, अल्का ठवरे, मालती फुंडे, जवाहर झलके, दुर्याेधन चेटूले, विजय गोंधळे, हंसराज चंदनखेडे आदी उपस्थित होते.
टिचकुले म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने जन्मदिनी एक तरी वृक्ष लावावा व त्यांचे संवर्धन करावे तरच खऱ्या अर्थाने जन्मदिन साजरा होईल. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी एक विद्यार्थी एक झाड असे आवाहन करून झाडांच्या संवर्धनासाठी सदैव तत्पर असण्याचे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
तत्पूर्वी विद्यालयातील हरितसेना व इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गावातील प्रमुख मार्गाने बँडच्या तालात वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष लावा घरोघरी, आरोग्य नांदेल त्यांच्या दारी, एक मूल, एक झाड अशा घोषणा दिल्या. शालेय परिसरात मोह, कडूनिंब, साग आदी झाडांची लागवड करण्यात आली. संचालन चंद्रशेखर लंजे यांनी तर आभार गिरीधर चारमोडे यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Need planting trees for pollution free environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.