ग्रामीण भागात वित्तीय विकास साक्षरतेची गरज
By Admin | Updated: July 16, 2015 00:58 IST2015-07-16T00:58:28+5:302015-07-16T00:58:28+5:30
ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे,

ग्रामीण भागात वित्तीय विकास साक्षरतेची गरज
नाबार्डचा वर्धापन दिन : अरविंद खापर्डे यांचे प्रतिपादन
भंडारा : ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे भंडारा जिल्हा विकास अधिकारी अरविंद खापर्डे यांनी केले. नाबार्डच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त तुमसर तालुक्यातील आलेसूर येथे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
नाबार्ड जिल्हा कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्त वित्त साक्षरता जनजागृती कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन तुमसर तालुक्यातील वाडी प्रकल्पातील आलेसूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंद खापर्डे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ कोकण विकास बँकेचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र डुंबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गर्रा (बघेडा) बँकेचे व्यवस्थापक नवघरे व धनंजय खंडेरा, आलेसूरच्या सरपंच छाया टेकाम, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अविल बोरकर, बेलेकर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे पृथ्वीराज शेंडे, चिखलीचे उपसरपंच रोशन सातवान उपस्थित होते.
खापर्डे यांनी ग्रामस्थांकरिता बँकेचे जीवन सुरक्षा कवच निर्मितीच्या विमा योजनाची कार्यपद्धती व उपयोगितेचे महत्व पटवून सांगितले. डुंबरे यांनी बँक द्वारा राबविण्यात असलेल्या विविध विकासाच्या योजना प्रभावीपणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले.
अविल बोरकर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत घेणाऱ्या विविध योजना १५ आॅगस्टच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी वैयक्तिक लाभाची कामे व सामूहीक लाभाच्या कामाची मागणी करण्याची व वाडी प्रकल्पाला यशस्वी करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यामधून वित्त साक्षरता अभियान अंतर्गत प्रतिनिधींनी पथनाट्य जागृती चमूने मनोरंजनातून ग्रामस्थांना बँकेच्या कार्यपद्धती व योजनेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन गौतम नितनवरे वाडी प्रकल्प समन्वयक यांनी केले व आभार जगन्नाथ कटरे प्रकल्प सहाय्यक यांनी केले. (शहर प्रतिनिधी)