योजनांचा लाभ पोहोचविण्याासाठी पुढाकाराची गरज

By Admin | Updated: October 6, 2015 00:49 IST2015-10-06T00:49:42+5:302015-10-06T00:49:42+5:30

फक्त घोषणा करून विकास होत नाही तर विकास साध्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे.

The need for initiatives to bring the benefits of the schemes | योजनांचा लाभ पोहोचविण्याासाठी पुढाकाराची गरज

योजनांचा लाभ पोहोचविण्याासाठी पुढाकाराची गरज

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन : पिटेझरी येथे समाधान शिबिर
साकोली : फक्त घोषणा करून विकास होत नाही तर विकास साध्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक लोकप्रतिनिधी व जागृत नागरिकांची आहे. असे प्रतिपादन आ.बाळा काशीवार यांनी केले.
राजस्व विभागाच्या वतीने आयोजित महाराजस्व सुवर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत स्वरुपातील समाधान योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रोगनिदान शिबिराचे अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी धीरजकुमार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चाचेरकर, उपविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एच. आळे, उपसभापती लखन बर्वे, जि.प. सदस्य रेखा वासनिक, मंदा गणवीर, नेपाल रंगारी, अशोक कापगते, सरपंच कविता भलावी, पं.स. सदस्य छाया पटले, उषा डोंगरवार, चेतना सोनवाने, धनवंता राऊत, जयश्री पर्वते, उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे, डॉ.संजय गडकुल, डॉ.उषा डोंगरवार, खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, डॉ.सुखदेवे उपस्थित होते.
आ. बाळा काशीवार म्हणाले, नकारात्मक विचारामुळे आपण आपले कर्तव्य विसरतो. भावी पिढीला सक्षम करण्यासाठी शासनाने विविध योजना अमलात आणल्या आहेत. या समाधान शिबिराचा उद्देश खऱ्या अर्थाने विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणे असा असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आ.काशीवार यांनी केले. तर यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले की, नागरिकांनी आपल्या इच्छाशक्तीचा वापर करून बीपीएल यादीतून आपले नाव वगळण्यासाठी प्रयत्न करून आर्थिकरित्या सक्षम व्हावे. शासनाने नागरिकांच्या विकासाचे सर्व अधिकारी ग्रामसभेच्या माध्यमाने नागरिकांना दिले आहेत. त्या दृष्टीने गावकऱ्यांची सर्वसम्मतीने निर्णय घेऊन शासनाच्या योजना गावात राबविण्याचे आवाहन धीरजकुमार यांनी केले. डॉ.चाचेरकर यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना विषयी मार्गदर्श नकेले.
यावेळी शिबिरात नागरिकांना विविध प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, वितरीत करण्यात आल्या. आरोग्य योजनेअंतर्गत पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी विविध विभागाचे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार शोभाराम मोटघरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी राजेंद्र निंबार्ते यांनी तर आभार प्रदर्शन तलाठी शेखर ठाकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The need for initiatives to bring the benefits of the schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.