शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

शिक्षण, संघटन व चळवळ निर्माण करणे काळाची गरज

By admin | Updated: January 18, 2016 00:31 IST

समाजामध्ये असलेली विषत्वाची भूमिका सोडल्याशिवाय सामाजिक एकोपा व बांधिलकी निर्माण होणार नाही.

शहापूर : समाजामध्ये असलेली विषत्वाची भूमिका सोडल्याशिवाय सामाजिक एकोपा व बांधिलकी निर्माण होणार नाही. जोपर्यंत समाजात असलेल्या विषारी मानसिकतेच्या लोकांपासून आपण दूर जाणार नाही, तोपर्यंतू बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मिती होणार नाही, असे प्रतिपादन इंजि. प्रभाकर भोयर यांनी केले. भीममेळावा पंचकमेटी व बौद्ध विहार ट्रस्ट शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात सुरु झालेल्या शहापूर येथील ऐतिहासिक ७२ व्या भीम मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामलाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती सदस्य दर्शन भोंदे, उद्योगपती डॉ. गजानन डोंगरवार,अ‍ॅड.अमरदीप चवरे, सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अलका रंगारी, प्रा.ममता मेश्राम, इंजि. रुपचंद रामटेके, आरती रंगारी, कविता पाटील, माजी उपसभापती निशांत मेश्राम, सुरेश गजभिये, पौर्णिमा साखरे, दुर्योधन खोब्रागडे, सहासीनी घरडे, भीमराव मेश्राम, आसित बागडे आदी उपस्थित होते. इंजि.भोयर म्हणाले, समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. मात्र हे समाजप्रबोधन लोकांच्या आचरणात कितपत येते त्यावर समाजाचे उणे होणे किंवा प्रगत होणे ठरत असते. समाज प्रबोधन होऊन सुद्धा समाज मागे का राहतो याचे मुळ आपल्या आचरणात आहे. तसेच शिक्षणाची नवीन व्याख्या स्विकारणे अत्यंत गरजेचे झाले. शिक्षण संघटन व चळवळ निर्माण झाल्याशिवाय बाबासाहेबांना अभिप्रेत समाजाची निर्मिती होणार नाही, असे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तत्पूर्वी सकाळी भिक्खुनी संघप्रिया यांच्याद्वारा त्रिरत्न वंदना करण्यात आली. तद्नंतर बौद्ध विहाराच्या प्रांगणात पंचशील ध्वजारोहण जिल्हा मुख्य सरकारी वकील विजय दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.प्रविण रामटेके, अ‍ॅड.अमरदिप चवरे, भीमराव भुरे, कृपाण गुरुजी, सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अलका रंगारी उपस्थित होते. दुपारी बौद्ध विहार प्रांगणात दिवारू वासनिक यांचे तर्फे भोजनदान वितरीत करण्यात आले. तद्नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या तैलचित्राची गावातील प्रमुख मार्गानी भीमरॅली काढण्यात आली. भीम रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका सहभागी झाले होते. डॉ.आंबेडकरांच्या जयघोषाने व भीम गीतांनी शहापूर गावात बौद्धमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी रॅलीचा समारोप बौद्ध विहारात करण्यात आला. यावेळी बौद्ध धर्मिय वधू वर परिचय मेळावा व व्यसनमुक्ती मार्गदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमासोबतच बुद्ध आंबेडकर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.रात्रीला भीम मेळाव्याच्या प्रमुख उद्घाटनानंतर प्रकाश पाटनकर व अश्विनी राजगुरु यांच्या समाजप्रबोधनपर भीम बुद्धावर आधारित मराठी, हिंदी गीत गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीम मेळाव्याचे मुख्य संयोजक मोरेश्वर गजभिये, संचालक राज्य पुरस्कृत सामाजिक कार्यकर्ता अम्रुत बन्सोड व आभार प्रदर्शन बौद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष शालीकराम मेश्राम यांनी केले.कार्यक्रमाकरिता मोरेश्वर गजभियजे, मनोज चवरे, अशोक भिवगडे, जगदिश डोंगरे, शालीकराम मेश्राम, प्रकाशबाबू गजभिये, मिलिंद खोब्रागडे, देवेंद्र रामटेके, आशिष रामटेके, पांडुरंग बेलेकर, तिर्थराज दुपारे, आशीर्वाद रामटेके, रविंद्र बोरकर, अनमोल गजभिये, बाळासाहेब खोब्रागडे, प्रितम घरडे याच्यासह भीममेळावा पंचकमेटी व बौद्ध विहार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)