शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बुद्धांच्या विश्वबंधुत्व विचाराची देशाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 9:49 PM

आज देशात अराजकता पसरली आहे. माणुस माणसाला ओळखत नाही. बालिका, तरुणी सुरक्षीत नाही. संविधान मुलतत्वाचे उल्लंघन होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट चौकटीपुरते सिमीत समजु नये.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : अमृत महोत्सवी ऐतिहासिक भीम मेळावा शहापूर येथे उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : आज देशात अराजकता पसरली आहे. माणुस माणसाला ओळखत नाही. बालिका, तरुणी सुरक्षीत नाही. संविधान मुलतत्वाचे उल्लंघन होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट चौकटीपुरते सिमीत समजु नये. डॉ. आंबेडकरांनी तथागत गौतम बुध्दाचे वैज्ञानीक विचार आपणास दिला. जगात सर्वात श्रेष्ठ काळानुरुप टिकणारे संविधान भारताचे आहे. परिणामी देशात सुख-समृध्दी व सामाजिक आर्थिक एकोपा निरंतर टिकत राहील, यासाठी बुध्दाच्या विश्वबंधुत्व विचारांची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भीममेळावा पंचकमेटी तथा बौध्द विहार ट्रस्ट शहापूर द्वारा ७५ व्या अमृत महोत्सवी ऐतिहासीक भीम मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार जोगेंद्र कवाडे हे होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, अखिल भारतीय किसान शेतमजूर काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, माजी आमदार दिलीप बन्सोड, पिरिपाचे राष्टÑीय अध्यक्ष जयदीप कवाडे, जि.प. चे माजी समाज कल्याण सभापती राजकपुर राऊत, विकास राऊत, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर गणविर, शैलेष मयुर, राजविलास गजभिये, मुंबईचे माजी शिक्षणाधिकारी तानबा डोंगरे, रिपाई जिल्हाध्यक्ष असित बागडे, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष मदनपाल गोस्वामी, बी.एस. गजभिये, रमेश जांगडे, मनिष वासनिक, प्रकाश गजभिये, सुर्यभान गजभिये, पांडुरंग बेलेकर, सरपंच मोरेश्वर गजभिये उपस्थित होते. माजी आमदार दिलीप बंसोड म्हणाले, समाजामध्ये काळानुरुप परिवर्तन होणे गरजेचे आहे. राज्यकर्र्त्यांनी अंमलबजावणी करतांनी संविधानाची पायमल्ली करीत आहे. विहार हे विचार परिवर्तन करणारे केंद्र असावे, आर्थिक व सामाजिक विकास किती झाले हे तपासणे प्रत्येक समाजाचे कर्तव्य आहे. नाना पटोले म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची खरी गरज आहे. शासन गरीबांना अधिक गरीब करीत आहे गरीबांकडून वस्तु सेवा कर वसुल करीत आहे. संविधान असेल तर आपण राहू यासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गुलाम बनविणाऱ्या शक्ती, समुहाचा, बुध्द आंबेडकर रुपी संविधानारुपी एकजुटीने नवी क्रांती घडविणे गरजेचे आहे.अध्यक्षीय भाषणात जोगेंद्र कवाडे म्हणाले, समाजाला सन्मानाने जगण्याचे आम्हाला शिकविले ते तथागत गौतम बुध्द तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. याचे विचार प्रत्येकान आचरणात आणावे, त्यानुसार समाजाचा विकास करा.पोलिस निरिक्षक सुभाष बारसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नविन बुध्द विहाराचे उद्घाटन लोकार्पण आणि स्मरणीकेचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रात्रीला अशोक निकाळजे व स्वरा तामगाडगे आणि संच यांचा समाजप्रबोधनपर बुध्द गितांचा जुगलबंदीचा कार्यक्रम झाला. तिसºया दिवशी प्रबोधनकार अनिरुध्द बनकर यांचा ‘मी वादळ वारा’ कार्यक्रम झाला. प्रास्ताविक संयोजक मोरेश्वर गजभिये यांनी केले. संचालन अमृत बंसोड यांनी तर आभार दुर्योधन खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनोज चवरे, अशोक भिवगडे, जगदीश डोंगरे, तिर्थराज दुपारे देवेंद्र रामटेके, तोताराम मेश्राम, गणेश वाहणे, विनोद खोब्रागडे, नितेश गजभिये, वृषभ गजभिये, प्रशांत मेश्राम, अनमोल गजभिये, सचिन बेलेकर, सिध्दार्थ ढोके, लाला फुले, अतुल गजभिय, योगेश गजभिये, जितु फुले, अभिजीत वासनिक, रत्नघोष हुमणे, सोनु टेंभुरकर, संजय गजभिये, मंगला गजभिये, त्रिवेणी बेलेकर, छाया घरडे, अल्का पाटील, सीमा खोब्रागडे, निलीमा गजभिये, भाविका गोस्वामी, रंजु खोब्रागडे, उषा मेश्राम, सत्यवंता लांजेवार, सोनल खांडेकर, अल्का गजभिये, माया वैद्य, आशा जनबंधु, वंदना सरादे, अंजली गजभिये, सुषमा खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.