शेतकऱ्यांच्या विकासाकरिता सहकारी संस्थांची गरज

By Admin | Updated: July 24, 2014 23:43 IST2014-07-24T23:43:47+5:302014-07-24T23:43:47+5:30

‘एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था चालवावी. स्वत:च्या विकासाकरीता संस्था टिकवून विहीत वेळेत कर्ज देणे व घेणे गरजेचे आहे, असे सेवा सहकारी

Need for co-operative organizations for the development of farmers | शेतकऱ्यांच्या विकासाकरिता सहकारी संस्थांची गरज

शेतकऱ्यांच्या विकासाकरिता सहकारी संस्थांची गरज

पालांदूर :‘एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था चालवावी. स्वत:च्या विकासाकरीता संस्था टिकवून विहीत वेळेत कर्ज देणे व घेणे गरजेचे आहे, असे सेवा सहकारी संस्था पालांदूरचे अध्यक्ष दामाजी खंडाईत यांनी वार्षिक आमसभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शनात संबोधले.
यावेळी मंचावर जिल्हा सहकारी मंडळ विकास अधिकारी बांगरे, पोलीस पाटील रमेश कापसे, संस्था सदस्य आनंदराव हत्तीमारे, वामन वैरागडे, विजय कापसे, पाथरे, हेमराज कापसे, आत्मा समितीचे सदस्य सुधीर धकाते, भंडारा सब्जी मंडळाचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, संस्थेचे गटसचिव सुनील कापसे आदी मंडळी उपस्थित होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामाजी खंडाईत यांनी पिक विमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. नवीन तंत्रज्ञानाची जोड स्वीकारुन अत्याधुनिक शेती कसावी. शेतीला पुरक व्यवसाय निवडावा, यासारखे मौलिक सल्ले आपल्या भाषणातून दिले.
जिल्हा सहकारी मंडळ विकास अधिकारी यांनी संस्था व सभासद यांचे नाते समजवून सांगितले. आत्मा समितीचे सदस्य सुधीर धकाते म्हणाले, शेतकऱ्यांनी अभ्यासातून शेती करावी. परंपरागतेला फाटा देत नवीन शेती पद्धत रुजविण्याची जिद्द मनी बाळगावी.
दूरदर्शनवरील शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रम अवश्य बघावे. खताच्या मात्रा आवश्यक तेवढ्याच द्याव्या. प्रति एकराला ४०:२०:२० या प्रमाणात खते वापरावी. किड नियंत्रणाकरीता गराडीच्या पानाचा उपयोग करावा. यावेळी २० मार्चपूर्वी कर्ज परमफेड करणाऱ्या ७२ शेतकऱ्यांना टिफीन डबा प्रोत्साहन म्हणून देण्यात आला.
कार्यक्रमाकरीता देवराम तलमले, राधेश्याम पाथरे, टिकाराम कावळे, बाळू खंडाईत, सुनील कापसे, रतीराम नंदनवार आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Need for co-operative organizations for the development of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.