परिवर्तनशील भिक्षु निर्माण होण्याची गरज

By Admin | Updated: October 16, 2016 00:30 IST2016-10-16T00:30:06+5:302016-10-16T00:30:06+5:30

जगात धर्माधर्मामध्ये स्पर्धेची होळ लागलेली आहे. धर्माचे प्रसारक मात्र आपापल्या परिने धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन कार्य करीत आहे.

The need for a changing monk | परिवर्तनशील भिक्षु निर्माण होण्याची गरज

परिवर्तनशील भिक्षु निर्माण होण्याची गरज

राजेदहेगाव येथे धम्म मेळावा : भदन्त सदानंद महास्थवीर यांचे प्रतिपादन
भंडारा : जगात धर्माधर्मामध्ये स्पर्धेची होळ लागलेली आहे. धर्माचे प्रसारक मात्र आपापल्या परिने धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन कार्य करीत आहे. यामुळे नवजीवन निर्माण करणारा समाज भरकटला जात आहे. पंचशील संपादन करण्यासाठी व चांगले सुसंस्कार मुलांमध्ये मानवतावादी विज्ञाननिष्ट विचार फक्त भिक्षू रूजऊ शकतो. यासाठी परिवर्तनशील भिक्षु निर्माण होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खु संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर यांनी केले.
भिमगिरी बुद्धीस्ट वेलफेअर सोसायटी अंतर्गत भीमगिरी सार्वजनिक बुद्ध विहार पर्यटनस्थळ राजेदहेगाव येथे धम्मचक्र प्रवर्तनदिन व दीक्षा महोत्सव वर्धापन दिनाप्रित्यर्थ आयोजित भीम बुद्ध धम्म मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात भदन्त सदानंद महास्थवीर बोलत होते. यावेळी उद्घाटन आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रामचंद्र लेंडे, आमदार रामचंद्र असरे, भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय महासचिव व्ही.एस. मोखले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधक सी.एच. बाबू आंबेडकर, एम.एस. मस्के, उपसरपंच सारिका डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य भिमेश ढोबळे, संजय रोडगे, किरण थोटे, वैशाली लेंडे, पुरण लोणारे, युगांतर कांबळे, पंचायत समिती सदस्य अमित वसानी, पोलीस पाटील मधुकर ढोबळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष दिलीप वैद्य, भिखु संघ उपस्थित होते.
यावेळी आमदार कवाडे यांनी, ज्या समाजात माणसांना मानसन्मानाने जगता येत नव्हते, मंदिरात जाण्याचा अधिकार नाही, दरम्यान २० वर्ष तपश्चर्या करून डॉ.बाबासाहेबांनी चक्रवती सम्राट अशोकांच्या रूपाने बुद्ध धम्म दिला. या धम्मरूपी भाकरीचा निटपणे खाऊ देत नाही. यासाठी क्रांतीरुपी धम्माची चळवळ उभारणे आज गरज आहे. आमदार रामचंद्र अवसरे यांनी, शिक्षित तरुणाईने निवड नोकरीच्या मागे न लागता परिवर्तनरुपी उद्योगाकडे वळा, उद्योगशिल बना. डॉ.बाबासाहेबांनी जगाला, बुद्धाच्या मार्गाने चालण्याचा मुल प्रभावी माध्यम दिला. त्यानुसार यशस्वी झालो तर समाज किंबहुना देश विकसीत होईल. तत्पूर्वी सकाळी धम्म ध्वजारोहण भन्ते संघाप्रिय यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मदनपाल गोस्वामी यांनी केले. संचालन व आभार सिद्धार्थ मेश्राम यांनी केले.

Web Title: The need for a changing monk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.