समस्या सोडविण्यासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज
By Admin | Updated: May 1, 2016 00:21 IST2016-05-01T00:21:01+5:302016-05-01T00:21:01+5:30
संघटना सर्व जातींच्या कर्मचारी वर्गासाठी अविरत संघर्ष करणारी, न्याय मिळवून देणारी व सर्वांच्याच कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे.

समस्या सोडविण्यासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज
जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा उपक्रम
सिल्ली : संघटना सर्व जातींच्या कर्मचारी वर्गासाठी अविरत संघर्ष करणारी, न्याय मिळवून देणारी व सर्वांच्याच कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे. त्यामुळे या महासंघाचे सभासद होऊन कोणत्याही आस्थापनेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी या संघटनेबरोबर एकनिष्ठ राहावे, या महासंघाला अधिक बळकट करावे असा एकच सूर उपस्थित अतिथींनी केला.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत जिल्हा शाखा भंडाराच्या कार्यालयाचे जि.प. परिसर येथील एका इमारतीमध्ये थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित अतिथींचा एकच सूर होता.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे चे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. भंडारा येथील सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तुमसर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक राहुल डोंगरे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब व महासंघ पुणेचे महासचिव प्रभाकर जीवने, उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, अतिरिक्त महासचिव गजानन थुल, विभागीय अध्यक्ष कविता मडावी, औरंगाबादचे विभागीय अध्यक्ष डॉ.रामटेके, अमरावतीचे विभागीय अध्यक्ष डॉ.तायडे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ उके, वर्धाचे अध्यक्ष संजय तायडे, चंद्रपूरचे अध्यक्ष तामगायडे, अमरावतीचे अध्यक्ष अशोक बोपडे, सचिव प्रज्ञा जवादे, राठोड, विनेश शैवाळे (संपर्क प्रमुख म.रा.) तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, उपाध्यक्ष अनमोल देशपांडे, सचिव मनिष वाहाने, अॅड.विलास कान्हेकर, सापरे, डी.एफ. कोचे, डॉ.मधुकर रंगारी, कुंदा गोडबोले, यशवंत उईके व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रामुख्याने राहुल डोंगरे, सुधीर वाळके, अरुण गाडे, सूर्यकांत हुमणे आदींनी या महासंघाच्या कार्यप्रणालीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.शिलवंत मडामे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनमोल देशपांडे यांनी केले. (वार्ताहर)