बचावासाठी सावधानता बाळगण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:01+5:30

कोरोना विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानी स्वत: उपाय योजना करून सावधानता बाळगावी. स्वच्छता पाळणे, नियमित हातधुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीतून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून त्यावर मात करता येते. कोरोना विषाणूला घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडळला निर्माण होणे आदी लक्षणे सांगून या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी उपाय सांगितले आहेत.

Need to be careful to survive | बचावासाठी सावधानता बाळगण्याची गरज

बचावासाठी सावधानता बाळगण्याची गरज

ठळक मुद्देमिलिंद मोटघरे : भंडारा बसस्थानकात कोरोनाविषयी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे. या आजाराला घाबरून न जाता, सावधानता बाळगण्याची गरज आहे, प्रतिपादन जिल्हा परीषद आरोग्य अधिकारी मिलिंद मोटघरे यांनी केले.
भंडारा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद आरोग्य विभागाव्दारे येथील मुख्य बसस्थानकात शुक्रवारी अधिकारी, वाहक, चालक व प्रवाशांसाठी कोरोनाविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा कोरोना सेलचे डॉ. सतीश गायकवाड, भंडारा आगाराचे व्यवस्थापक, चालक, वाहक व प्रवाशांची उपस्थिती होती. यावेळी मिलिंद मोटघरे म्हणाले, कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, विषाणू रूग्णाच्या संपर्कात आल्यास या आजाराची शक्यता उदभवू शकते.
कोरोना विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानी स्वत: उपाय योजना करून सावधानता बाळगावी. स्वच्छता पाळणे, नियमित हातधुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीतून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून त्यावर मात करता येते. कोरोना विषाणूला घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडळला निर्माण होणे आदी लक्षणे सांगून या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी उपाय सांगितले आहेत. बाहेर देशातील कोरोना विषाणू बाधित क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांमध्ये जर लक्षणे आढळली तर त्वरित कॉल सेंटर अथवा आपल्या जवळील शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा. बाधित रूग्णांनी (प्रवासी) मास्कचा वापर करावा, इतर लोकांपासून दूर राहावे, घराबाहेर अधिक काळ वावरू नये, स्वत: उपचार करू नये, डॉक्टराच्या सल्लानुसार उपचार करावा. शिंकताना खोकताना रूमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करावा अशा प्रकारे काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तीची व्यवस्था जिल्हा रूग्णालयात आलेली आहे.
कार्यक्रमासाठी आरोग्य सेविका स्मिता फुले, सुनिता बागडे, डॉली पांडे, रिता तितीरमारे, कविता बारसागडे, सचिन खराबे यांच्यासह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Need to be careful to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.