शिक्षणाच्या हक्कासाठी जागृती आवश्यक
By Admin | Updated: June 25, 2014 23:36 IST2014-06-25T23:36:03+5:302014-06-25T23:36:03+5:30
शिक्षण मिळविणे हा सर्वांचा अधिकार आहे. या अधिकाराची जाणीव सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य शिक्षण विभागाचे आहे. तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून

शिक्षणाच्या हक्कासाठी जागृती आवश्यक
वरठी : शिक्षण मिळविणे हा सर्वांचा अधिकार आहे. या अधिकाराची जाणीव सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य शिक्षण विभागाचे आहे. तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यात शिक्षणाची ताकद निर्माण करून अभ्यासाप्रती उत्साह निर्माण करण्यासाठी प्रयत्न हे प्रशंसनीय आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी १०० टक्के उपस्थित व शिक्षणाच्या हक्कासाठी जागृती करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी केले.
वरठी येथे नेरी केंद्रांतर्गत शाळा शुभारंभ दिवस निमित्त जनजागरण अभियान सुरु करण्यात आले. उद्घाटन सरपंच संजय मिरासे यांच्या हस्ते व प्राचार्य तथागत मेश्राम यांच्या अध्यक्षतेत झाले. मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी एस.बी. राठोड, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे, प्रा.हिवारे, प्रा.मेश्राम व प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अशोक गजभिये, मुख्याध्यापिका सुनंदा वाढीवे, सीताबाई गायधने, मुख्याध्यापक फंदू धुर्वे व केंद्र प्रमुख जयंत उपाध्ये उपस्थित होते.कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे यांनी शिक्षणाचे महत्व व शिक्षणाचा अधिकार व कर्तव्य याबद्दल माहिती दिली. संचालन सहाय्यक शिक्षक महेश जगनिक, प्रास्ताविक केंद्र प्रमुख जयंत उपाध्ये व आभार हिवराज राऊत यांनी मानले. कार्यक्रमात बोंद्रे, चरडे, कापसे, विलास कोटांगले, चचाणे, एस.एम. उरकुडे, श्रीपाद, भुरे, कांबळे, वासनिक, मोथरकर, रामटेके, निनावे, टिचकुले, जांभुळकर, लता गजभिये, धुर्वे, चोपकर उपस्थित होते.(वार्ताहर)