एनडीडीबीकडून दूध उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:30 IST2017-08-03T23:29:44+5:302017-08-03T23:30:09+5:30
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड एनडीडीबी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकºयांना त्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, .....

एनडीडीबीकडून दूध उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड एनडीडीबी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकºयांना त्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दिले.
जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाद्वारे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड एनडीडीबीचे एनडीपी-१ व्हीबीएमपीएस या कार्यक्रमांंतर्गत डेअरी सहकारिता जागृती अभियान व साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
रथ म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भंडारा दुध संघ व दुध उत्पादकांना एनडीडीबी सोबत जोडलेले जाईल. त्यांनी उपस्थित दुध उत्पादकांना असे सांगितले की, येणाºया सर्व परिस्थितीचा सामना करण्याकरीता सज्ज असावयास पाहिजे जे प्रकल्प भंडारा जिल्हा दुध संघाला एनडीडीबीकडून दिलेले आहे. ते संघ राबवित असून यशस्विपणे राबविल्यास दुध उत्पादकांना त्याचा फायदा होईल व निरनिराळे प्रकल्प भंडारा दुध संघामार्फत दुध उत्पादकांकरिता दिले जातील, अशी ग्वाही दिली. दुध उत्पादन वाढवून दुधाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी व वाढत्या तीव्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण दुधाचे उत्पादन करण्याचे आवाहन उपस्थित दुध उत्पादकांना केले.
अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी जिल्ह्यातील दुध उत्पादकांच्या दुध उत्पादनाबाबत विविध समस्या व येणाºया अडचणी तसेच दुध उत्पादकांना शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून न मिळणारे सहकार्य याबद्दल नाराजी व्यक्त केली. एनडीडीबीने भंडारा दुध संघास भरघोस मदत करून राज्यात दुध उत्पादकांचे जिवनमान उंचावण्याकरीता एनडीडीबीच्या अध्यक्षांनी संघास मदत करावी, अशी विनंतीही केली. प्र्रशासन जिल्ह्यातील दुध उत्पादकांना कुठलेच सहकार्य करीत नसल्याने जिल्ह्यातील दुधाची गुणवत्ता वाढत नसल्याची खंतही सुनिल फुंडे यांनी व्यक्त केली. दुध उत्पादक गुणवत्तापूर्ण दुधाच्या स्पर्धेत आताच्या परिस्थितीत उतरू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. दुधाच्या व्यवसायाकडे शेतकºयांचा फारसा कल राहत नसून दुध संघालाही कमी प्रमाणात दुध पुरवठा केला जातो आणि त्यामुळेच दुध संघ बाजारात पाहिजे त्या प्रमाणात स्पर्धेत फार काळ टिकू शकत नाही. जिल्ह्यातील दुध उत्पादकांना प्रशासनाकडून आर्थिक व व्यावसायीक सहकार्य लाभले तर तो दिवस विकासाच्या दुर नाही. भंडारा जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ हा विदर्भातील अन्य दुध कंपन्याच्या बरोबरीने स्पर्धेत ठाण मांडून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी प्रास्ताविकातून दूध उत्पादकांना व भंडारा दूध संघाला दुध संकलन करीत असताना खाजगी दुध खरेदी दाराकडून होत असलेला त्रास तसेच त्यांच्याशी करावी लागणारी दुध संकलनातील तीव्र स्पर्धा याची विस्तृत माहिती दिली.
याप्रसंगी बोर्डाचे उपमहाप्रबंधक अनिल हातेकर, प्रादेशिक दुध व्यवसाय अधिकारी हेमंत गडवे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी जगन्नाथ भोर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात जिल्हा व्यवसाय विकास अधिकारी निलेश बंड, महानंद मुंबईचे संचालक निलकंठाव बाबा कोढे, सभापती विनायक बुरडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे संचालक महेंद्र गडकरी, आशिष पातरे, नरेश धुर्वे, राम गाजीमवार, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, विलास काटेखाये, अनिता साठवणे, रिता हलमारे, श्रीकृष्ण पडोळे, सत्यवान हुकरे, योगेश हेडाऊ, माधवराव बांते, श्रावण कापगते, यादवराव कापगते, माधुरी हुकरे, महादेव पचघरे, निलकंठ कायते, सुरेश बिसणे, रामदास शहारे, राजेंद्र झरकर उपस्थित होते. संचालन कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी तर आभार विनायक बुरडे यांनी मानले.