करडी व डोंगरदेव येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST2021-03-23T04:37:28+5:302021-03-23T04:37:28+5:30
बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जयंत वैरागडे, विठ्ठलराव कहालकर, वासुदेव ...

करडी व डोंगरदेव येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक
बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जयंत वैरागडे, विठ्ठलराव कहालकर, वासुदेव बांते, सुरेश बिसने, रष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, झगडू बुद्धे, प्रदीप बुराडे, महादेव पचघरे, महादेव बुरडे, नरेश ईश्वरकर, बालू भोयर, भूपेंद्र पवनकर, विलास बांडेबुचे, महादेव फुसे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार कारेमोरे म्हणाले, करडी व बेटाळा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी सुरेवाडा सिंचन प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्याबरोबर धापेवाडाचे पाणी परिसरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाची मंजुरी मिळवली. मुंढरी ते रोहा पूल वेळेत पूर्ण केला जाईल तसेच पर्यटन विकास व रस्त्यांसाठी भरीव निधी खेचून आणत कामे सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला करडी व बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, क्षेत्रातील कार्यकर्ते, आघाडी सेलचे पदाधिकारी, बूथ प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.