साकोली तालुक्यात नक्षलवादी सक्रीय !

By Admin | Updated: July 29, 2016 00:31 IST2016-07-29T00:31:27+5:302016-07-29T00:31:27+5:30

तालुक्यातील भिमलकसा प्रकल्प (वडेगाव) येथे सहा दिवसांपूर्वी नक्षलवादी येऊन रात्रीचे जेवण करून निघून गेल्याची माहिती आहे.

Naxalite activists in Sakoli taluka! | साकोली तालुक्यात नक्षलवादी सक्रीय !

साकोली तालुक्यात नक्षलवादी सक्रीय !

शोधमोहीम सुरू : वडेगाव येथे नक्षलवादी आल्याची माहिती
संजय साठवणे साकोली
तालुक्यातील भिमलकसा प्रकल्प (वडेगाव) येथे सहा दिवसांपूर्वी नक्षलवादी येऊन रात्रीचे जेवण करून निघून गेल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस दलाने संपूर्ण जंगल परिसरात शोधमोहीम राबविली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नक्षलप्रभावित गावातील पोलीस पाटलांना सतर्कतेचा इशारा देऊन हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
साकोली तालुक्यातील वडेगाव येथे भिमलकसा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने हा तलाव गाव समिती व ग्रामपंचायतने मासेमारीकरिता पाच वर्षासाठी विलास केवट यांना लीजवर दिला आहे. या तलावातील मासे कुणी चोरून नेऊ नये, यासाठी केवट यांनी तलावाजवळ एक झोपडी बांधून रात्रीसाठी दोन जणांना देखरेखीसाठी ठेवतात. ते दोघेही या तलावाची देखरेख करतात.
सदर तलाव हे नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागून असून तलावाच्या चहूबाजूने घनदाट जंगल आहे. शनिवार २३ जुलैच्या रात्री तलावाजवळील झोपडीत मारोती मेश्राम (५०) व महादेव मेश्राम (५०) दोन्ही रा.खोडशिवणी रात्रपाळीत होते. मध्यरात्री ९ जण नक्षली गणवेशात आले. त्यात सहा पुरूष तर तीन महिलांचा समावेश होता. येथे आल्यानंतर त्यांनी जेवन मागितले व काही वेळानी निघून गेले. या घटनेची माहिती तीन ते चार दिवसानंतर बाहेर आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र सदर इसम हे नक्षलवादी होते किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: Naxalite activists in Sakoli taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.