निसर्ग अभ्यास शिबिर
By Admin | Updated: May 11, 2014 23:14 IST2014-05-11T23:14:41+5:302014-05-11T23:14:41+5:30
येथील कृष्णमुरारी कटकवार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालययात राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे सलग १४व्या वर्षी १० दिवसीय पक्षी

निसर्ग अभ्यास शिबिर
भंडारा : येथील कृष्णमुरारी कटकवार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालययात राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे सलग १४व्या वर्षी १० दिवसीय पक्षी निरीक्षण व निसर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कटकवार प्राचार्य मुकेश फुलबांधे, राऊत, संजय शेंडे, प्रा. अशोक गायधने यांचे हस्ते करण्यात आले. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी ७ ते १० या वेळात पक्षी, कीटक, फुलपाखरे, वनस्पती, सरपटणारे प्राणी, सुक्ष्मजीव यांचा अभ्यास करुन त्यांची निसर्गओळख, इंग्रजी-मराठी नावे, त्यांचा अधिवास यावर माहिती निसर्ग अभ्यासक प्रा.अशोक गायधने यांनी दिली. शिबिरात नवतळा परिसर, गावतलाव परिसर, नर्सरी कॉलनी व नर्सरी पहाडी, गडकुंभली टेकडी, गडकुंभली तलाव, मंदिर, पर्यटन संकुल परिसर, कृषी विज्ञान व कृषी चिकित्सा केंद्र, दुर्गाबाई डोह, इरिगेशन कॉलनी, कटकवार नर्सरी, जमनापुर व आलेबेदर परिसरात नेचर ट्रेकिंग दररोज वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. या नेचर ट्रेकिंगदरम्यान शिबिरार्र्थींना ८०-९० प्रकारच्या पक्ष्यांची, २५-३० प्रकारचे फुलपाखरे, विविध वनस्पती झाडे, निसर्गोद्योग गांडूळ खत, मधमाशी पालन, मशरुम उद्योग, मत्स्य व्यवसाय इत्यादी प्रकारची माहिती प्रा. अशोक गायधने, शिबिर स्वयंसेवक पवन रामटेके, पारस राऊत, यश भजे यांनी माहिती दिली. शिबिरात विषारी-बिननविषारी साप, त्यांचे वैशिष्ट्ये, अंधश्रद्धा-गैरसमजुती व इंग्रजी नावे यावर प्र्रकाश गायधने यांनी टाकला. तारे, ग्रह व नक्षत्र, रास, आकाशगंगा यावर विशेष व विस्तृतपणे खगोलशास्त्र वर्ग प्रा.अशोक गायधने व रामटेके यांनी घेतला. प्रत्यक्ष ग्रह-तारे-रास नक्षत्र कसे ओळखावे याची माहिती प्रत्यक्ष चार्ट, रंगीत चित्रे यांच्या सहाय्याने दिली. फुलांच्या साहाय्याने झाड कसे ओळखावे, टाकाऊ साहित्यापासून टिकावू वस्तू, उदा. कागदी व कापडी पिशव्या, वह्या निर्मिती, घरटे व पाणपोई निर्मिती, बीज संकलन यावर माहिती पारस राऊत, पवन रामटेके, यश भजे व दिव्या मसराम यांनी दिली. उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून दिव्या मसराम, अर्सलान बेग, आयुष मेश्राम, पवन रामटेके यांचा सत्कार प्राचार्य मुकेश फुलबांधे, प्राचार्य श्रीधर खेडीकर, मनीषा काशिवार, इंग्लिश स्कूलचे संजय शेंडे व राऊत यांचे हस्ते करण्यात आला. तसेच अभिश्री सूर्यवंशी, पूजा कवास, उत्कर्षा गिदमारे, शर्वरी भालाधरे, पीयूष रामटेके, कौस्तुभ येवले, रुचिर रहाटे, भारत हडियाल, राजेश हडियाल, शिवम शेंडे यांना प्रमाणपत्र विठ्ठल सुकारे, मुकेश पंचभाई, प्रा. के.पी. बिसेन, एच.ए. सोनवाने, सेवक कापगते, बी.एस. लंजे, शिवपाल चन्ने यांचे हस्ते देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)