उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST2021-03-22T04:32:25+5:302021-03-22T04:32:25+5:30
यासंबधीची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी करूनही संबधित विभागांनी त्या तक्रारींची ...

उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
यासंबधीची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी करूनही संबधित विभागांनी त्या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गत पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सदर उपोषणाला केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, डॉ. देवानंद नंदागवळी, संयुक्त लोकशाही आघाडीच्या वतीने अचल मेश्राम, शशिकांत भोयर, नाशिक चौरे, अंबादास नागदेवे, नागरतन रंगारी, हेमा गजभिये, अनिल चचाणे, डॉ. महेंद्र गणवीर, शशिकांत देशपांडे, उमराव सेलोकर, गौरीशंकर पालांदुरकर, श्रीकांत नागदेवे, त्रिवेणी वासनिक, दिलीप मोटघरे, दिनेश वासनिक व सहकारी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
सदर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक यांनी या उपोषणाची दखल घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा व उपोषणकर्त्याला न्याय मिळवून द्यावा, तातडीने विभागीय चौकशी न झाल्यास संयुक्त लोकशाही आघाडीच्या वतीने व बसपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.