निसर्ग चक्रात खोळंबली रोवणी

By Admin | Updated: July 28, 2016 00:31 IST2016-07-28T00:31:34+5:302016-07-28T00:31:34+5:30

तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे.

Nature Chakra Vacation Routine | निसर्ग चक्रात खोळंबली रोवणी

निसर्ग चक्रात खोळंबली रोवणी

बळीराजा चिंताग्रस्त : लाखांदूर तालुक्यात पावसाची हुलकावणी, वलमाझरी तलाव तुडूंब भरल्याने जलमयस्थिती
लाखांदूर : तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे.
दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवट शंभर टक्के रोवणी आटोपतात. मात्र यंदा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने व पऱ्ह्याची वाढ मर्यादा संपल्याने उशिरा रोवणी झाल्यास एकूण उत्पादनात मोठी घट येऊन नुकसानीचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. मागील पाच वर्षांची पावसाची टक्केवारी बघीतली असता मोठी तफावत दिसून येते.
२५ जुलै २०११ पर्यत एकूण ६८३.५ मि.मी. २५ जुलै २०१२ पर्यंत एकूण ३७८.९ मि.मी., २५ जुलै २०१३ पर्यंत एकूण ११६२.९ मि.मी., २५ जुलै २०१४ पर्यंत एकूण ३५२.६ मि.मी., २५ जुलै २०१६ पर्यंत एकूण ३८२ मि.मी. पावसाची नोंद आहे. शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. या वर्षी १० जुलै ला केवळ सर्वाधिक ९० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.
पऱ्हे घातल्यानंतर २० ते २५ दिवसाचे आत रोवणी आटोपली पाहिजे. परंतु तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोवणी खोळंबली आहे. महागडे बियाणे घेऊन शेती होऊ शकली नसल्याने दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास खरीप हंगाम कोरडा जाणार असल्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. रोवणी न झाल्याने कृषी केंद्र औषधी व खत विक्री बंद पडल्याने ओस पडली आहेत. (तालुका प्रतिनिधी)

साकोली : वलमाझरी तलाव पाण्याने तुडूंब भरलेला असतानासुद्धा पाण्याअभावी वलमाझरी, पिंडकेपार परिसरातील रोवणी रखडलेली आहेत.
वलमाझरी परिसरातील जमिन मुरमाड असल्यामुळे तलावातील पाण्याशिवाय रोवणी होत नाही, हा दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. दरवर्षी तलावातील पाणी सोडूनच या परिसरातील रोवणी केली जातात. यावर्षी सुरूवातीलच्या पावसानेच तलाव तुडूंब भरलेला आहे.
परंतु पाणी वाटपाची जबाबदारी असलेल्या ल.पा.च्या अधिकाऱ्यांची अनास्था शेतकऱ्यांसाठी मारक ठरू पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी करूनसुद्धा तलावातील पाणी सोडण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी याबात लघु सिंचाई विभागाला लेखी निवेदन दिले, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. वेळेवर रोवणी न झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. रोवणी वेळेत होत नसल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे नेहमी सरकारच्या वतीने सांगितले जाते. परंतु येथील निगरगट्ट अधिकारी शेतकऱ्यांची कैफियत एैकायला तयार नाही. मग शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा बिकट प्रसंग आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तलावातील पाणी लवकर सोडून परिसरातील शेतकऱ्यांची खोळंबलेल्या रोवणीची समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे (शहर प्रतिनिधी)

Web Title: Nature Chakra Vacation Routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.